ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 06:55 AM2024-10-24T06:55:30+5:302024-10-24T06:55:45+5:30

कोलकाता विमानतळ गुरुवारपासून १५ तासांसाठी बंद राहणार आहे.

Cyclone 'Dana' will hit at 120 km per hour; Rains start, 350 trains cancelled | ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द

ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द

भुवनेश्वर/कोलकाता : बंगालच्या उपसागरावर काता बंगालच्या चक्रीवादळ 'दाना'चा बाह्य पट्टा बुधवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकला. त्यामुळे ओडिशातील केंद्रपाडा, भद्रक, तसेच पश्चिम बंगालमध्ये उत्तर व दक्षिण २४ परगणा, पूर्व व पश्चिम मेदिनापूर, झारग्राम, कोलकाता, हावडा, हुगळी आदी जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाला सुरुवात झाली. २५ ऑक्टोबरपर्यंत ३५० रेल्वे रह करण्यात आल्या आहेत. वादळ शुक्रवारी पहाटे ताशी १२० किमी वेगाने ओडिशाला धडकण्याचा अंदाज आहे. कोलकाता विमानतळ गुरुवारपासून १५ तासांसाठी बंद राहणार आहे.

खारफुटीमुळे प्रभाव कमी राहणार!

चक्रीवादळ भीतरकनिका उद्यानाजवळ धडकणार आहे. या ठिकाणी २०० चौरस किलोमीटर परिसरातील खारफुटीच्या जंगलामुळे चक्रीवादळाचा प्रभाव कमी असेल, असा अंदाज प्रधान मुख्य वनसंरक्षक सुशांत नंदा यांनी वर्तविला. ओडिशामध्ये १४ जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका आहे. त्यामुळे सरकारने एनडीआरएफची १९, राज्य शीघ्रकृती दलाची ५१ आणि ४० इतर पथके सज्ज ठेवली आहेत. नागरिकांना हलविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Cyclone 'Dana' will hit at 120 km per hour; Rains start, 350 trains cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.