Cyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 12:51 PM2018-11-16T12:51:10+5:302018-11-16T13:01:11+5:30
'तितली' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूमध्ये या चक्रीवादळाने कहर केला असून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
चेन्नई - 'तितली' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूमध्ये या चक्रीवादळाने कहर केला असून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ताशी 80 ते 90 किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे आणि तुफान पावसामुळे किनाऱ्याजवळच्या भागात काहीशी पडझड झाली आहे. पुढील 24 तासात गज चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकले होते. गुरुवारी (15 नोव्हेंबर) कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे हे चक्रीवादळ धडकले. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.
भारतीय नौदल आणि तीस हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. किनारपट्टी भागातील ७६ हजार २९० लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती तामिळनाडू सरकारच्या वतीने देण्यात आली. प्रशासनाने घेतलेल्या चोख खबरदारीमुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र नागपट्टनमा येथे प्रचंड पाऊस आणि तुफान सुरुच आहे. दोन तासात या चक्रीवादळात अनेक झाडे जमीनदोस्त झाली आहेत.
Tamil Nadu: Trees uprooted and houses damaged in Nagapattinam in the overnight rainfall and strong winds which hit the town. #GajaCyclonepic.twitter.com/9ObvcqJlDD
— ANI (@ANI) November 16, 2018
पुढच्या 24 तासात या वादळाचे रुपांतर भीषण चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विशेषतः हे वादळ तामिळनाडूतील नागपट्टणम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी येथील कराईकल येथील किनारपट्टीवर आहे.
Cyclone Gaja : तामिळनाडूवर 'गज' चक्रीवादळाचं संकट, 76,000 लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
'गज' चक्रीवादळाआधी तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले होते. या चक्रीवादळा दरम्यान ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होते. तितली हे चक्रीवादळ भयंकर असून बंगालच्या खाडीतील दक्षिण आणि पश्चिम मध्य क्षेत्राला या वादळाचा फटका बसला होता.
The eye of #GajaCyclone is now making a landfall. It will take 1 hour for it to fully cross from sea to land. The intensity of the wind will be less when the eye of cyclone falls on land and it will increase again gradually: Chennai MeT department pic.twitter.com/aBzyndFL9f
— ANI (@ANI) November 15, 2018
'गज' या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग, केरळमधील काही भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मच्छिमारांना 12 नोव्हेंबरपासून समुद्रात न जाण्याची सूचनाही देण्यात आली होती.