सोमवारी मिचौंग चक्रीवादळ धडकणार, दोन राज्यांना हवामान विभागाचा इशारा; शाळा, ट्रेनही ठेवणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 10:11 PM2023-12-02T22:11:13+5:302023-12-02T22:11:38+5:30
मिचौंग चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या उत्तरेकडील किनारपट्टीवरील जिल्हे आणि अंतर्गत भागात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने मिचौंग चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. यामुळे दोन राज्यांत तुफान पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बंगालच्या खाडीवर दबावाचे क्षेत्र बनू लागले आहे. यामुळे तीन डिसेंबरला याचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होणार आहे.
मिचौंग चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या उत्तरेकडील किनारपट्टीवरील जिल्हे आणि अंतर्गत भागात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनार्यावरून 4 डिसेंबरच्या सकाळपर्यंत पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचेल, असे आयएमडीने म्हटले आहे.
तसेच दुसऱ्या दिवशीपर्यंत उत्तरेकडे, जवळजवळ समांतर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनार्याजवळ सरकेल आणि नंतर दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. ताशी 80-90 किमी ते 100 किमी प्रति तास या वेगाने वारे वाहतील, असा इशारा देण्य़ात आला आहे.
चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूरसह अनेक शहरांमध्ये पावसामुळे परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चेन्नईच्या अरक्कोनम शहरात एनडीआरएफला स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. मच्छीमारांना देखील समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. १७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.