Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचा तडाखा! पंतप्रधान मोदींची गुजरातसाठी 1000 कोटींच्या मदतनिधीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 06:28 PM2021-05-19T18:28:23+5:302021-05-19T18:33:40+5:30
Tauktae Cyclone Gujarat And Narendra Modi : तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली.
नवी दिल्ली - केरळपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर विनाशाचे थैमान घालणारे तौत्के चक्रीवादळ (Tauktae Cyclone) सोमवारी रात्री उशीरा सौराष्ट्रच्या किनारपट्टीजवळ गुजरातमध्ये (Gujarat) धडकले. अतिशय तीव्र स्वरूपाच्या या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुजरातमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हजारो गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. सोमवारी दुपारनंतर चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या काही किलोमीटर अंतरापासून गुजरातकडे सरकले. त्यावेळी ताशी 190 किलोमीटरहून अधिक वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांनी तडाखा दिला.
गुजरातला धडकले त्यावेळी तौक्तेचे स्वरूप अतिशय तीव्र झाले होते. चक्रीवादाळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे गुजरातचे प्रशासन सामना करण्यासाठी सज्ज होते. 16 हजारांहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 40 हजार झाडे आणि 10 हजारांहून अधिक विजेचे खांब पडले आहेत. तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल 1000 कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. तसेच देशभरात तौत्के चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागालाही मदत जाहीर करण्यात आली आहे.
PM Modi announces financial assistance of Rs 1,000 crore for immediate relief activities in Gujarat. Union Government to deploy an Inter-Ministerial Team to visit the state to assess the extent of damage in the State: PMO
— ANI (@ANI) May 19, 2021
तौत्के चक्रीवादळात मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. चक्रीवादळामुळे सौराष्ट्र, दीव, उना इत्यादी भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा अनेक तास खंडित झाला होता. सुमारे 16 कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी 12 रुग्णालयांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. गुजरातच्या वेरावल बंदराजवळ अडकलेल्या ‘मत्स्य’ तसेच आणखी दोन नौकांमधून 16 जणांची गुजरात तटरक्षक दलाच्या जवानांनी सुटका केली. तीन नौका मंगळवारी सकाळी समुद्रात गेल्या होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Undertook an aerial survey over parts of Gujarat and Diu to assess the situation in the wake of Cyclone Tauktae. Central Government is working closely with all the states affected by the cyclone. pic.twitter.com/wGgM6sl8Ln
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2021
Ex-gratia of Rs. 2 lakh would be given to the next of kin of those who lost their lives due to Cyclone Tauktae in all the affected states. Rs. 50,000 would be given to the injured. GOI is in full solidarity with those affected and will provide them all possible support.
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2021