Cyclone Titli Updates: ओडिशामध्ये 'तितली' चक्रीवादळाचा कहर, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 07:43 AM2018-10-11T07:43:57+5:302018-10-11T11:44:56+5:30
Cyclone Titli Updates: बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले आहे.
भुवनेश्वर - बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, तितली हे चक्रीवादळ 10 किलोमीटर प्रतितास या वेगानं पुढे सरकले आहे. या चक्रीवादळामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
#WATCH: Early morning visuals of #TitliCyclone making landfall in Srikakulam's Vajrapu Kotturu. #AndhraPradeshpic.twitter.com/x7H4yoF7ez
— ANI (@ANI) October 11, 2018
गुरुवारी (11 ऑक्टोबर) हे वादळ ओडिशातील गोपाळपूर आणि आंध्र प्रदेशातील कलिंगापत्तनमच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
#WATCH: #TitliCyclone makes landfall in Gopalpur. #Odishapic.twitter.com/x49MsPkU9U
— ANI (@ANI) October 11, 2018
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी परिस्थितीची माहिती घेतली असून त्यांनी गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यातील कलेक्टरांना तटवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची घरं तातडीने रिकामी करण्यास सांगितलं आहे. तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी निवारागृहे उभारण्यास सांगण्यात आले आहे.
#Visuals from Ganjam's Gopalpur after #TitliCyclone made landfall in the region at 5:30 am today. 10,000 people from low lying areas had been evacuated to govt shelters till last night. #Odishapic.twitter.com/HEYog0DNe7
— ANI (@ANI) October 11, 2018
तितली हे चक्रीवादळ भयंकर असून बंगालच्या खाडीतील दक्षिण आणि पश्चिम मध्य क्षेत्राला या वादळाचा फटका बसला आहे. गोव्यावरही या चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Odisha: People living in low lying areas evacuated to relief camps in Gopalpur. Land fall of #TitliCyclone is expected at 5.30 am tomorrow in south Odisha. pic.twitter.com/YfMSqdqzcH
— ANI (@ANI) October 10, 2018
दुसऱ्या बाजूने अरबी समुद्रात उठलेल्या लुबान चक्रीवादळाची गतीही आता वाढून ताशी 110 किलोमीटरवर गेल्यामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. परंतु ते येमेनच्या दिशेने सरकले असल्यामुळे लक्षद्वीप वगळता भारतावर फारसा परिणाम होणार नाही. गोव्यात काही ठिकाणी रविवारी व सोमवारी पाऊस पडला होता. मंगळवारीही काही प्रमाणात पाऊस कोसळला. लुबान चक्रीवादळ भारतीय उपखंडापासून दूर जात आहे. तर तितली बंगालच्या उपसागरातून भारतीय भूभागात शिरले आहे. त्यामुळे लुबानपेक्षा तितली चक्रीवादळ अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
#Visuals from Odisha's Ganjam district where #CycloneTitli is expected to make landfall tomorrow morning. 10,000 people from low lying areas have been evacuated to govt shelters. pic.twitter.com/b5szAunSRS
— ANI (@ANI) October 10, 2018
खोल समुद्रात न जाण्याचा इशारा
चक्रीवादळांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना 74 किलोमीटरपेक्षा अधिक दूर न जाण्याचा इशारा तटरक्षक दलाने दिला आहे. एरव्ही 9 ऑक्टोबरपर्यंत हा इशारा मर्यादित होता. परंतु प्राप्त परिस्थितीत चक्रीवादळाची वाढलेली गती लक्षात घेता हा इशारा 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.
Odisha: Chief Minister Naveen Patnaik visited office of Special Relief Commissioner office this evening & reviewed preparedness for impending landfall of the cyclonic storm #TITLI. 3 lakh people have been evacuated till now pic.twitter.com/e8FaFdAiS7
— ANI (@ANI) October 10, 2018