Cyclone Titli Updates: ओडिशामध्ये 'तितली' चक्रीवादळाने हाहाकार, आठ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 08:33 AM2018-10-12T08:33:45+5:302018-10-12T08:59:23+5:30

पाऊस आणि वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

Cyclone Titli Updates: Cyclone weakens; eight dead in Andhra Pradesh, Odisha | Cyclone Titli Updates: ओडिशामध्ये 'तितली' चक्रीवादळाने हाहाकार, आठ जणांचा मृत्यू

Cyclone Titli Updates: ओडिशामध्ये 'तितली' चक्रीवादळाने हाहाकार, आठ जणांचा मृत्यू

googlenewsNext

भुवनेश्वर -  बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे. गुरुवारी (11 ऑक्टोबर) तितली चक्रीवादळ हे ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले. या चक्रीवादळामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पाऊस आणि वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, तितली हे चक्रीवादळ 10 किलोमीटर प्रतितास या  वेगानं पुढे सरकले आहे. 





ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी परिस्थितीची माहिती घेतली असून त्यांनी गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यातील कलेक्टरांना तटवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची घरं तातडीने रिकामी करण्यास सांगितलं आहे. तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी निवारागृहे उभारण्यास सांगण्यात आले आहे.


तितली हे चक्रीवादळ भयंकर असून बंगालच्या खाडीतील दक्षिण आणि पश्चिम मध्य क्षेत्राला या वादळाचा फटका बसला आहे. गोव्यावरही या चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.



 

Web Title: Cyclone Titli Updates: Cyclone weakens; eight dead in Andhra Pradesh, Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.