Cyclone Titli Updates: ओडिशामध्ये 'तितली' चक्रीवादळाने हाहाकार, 57 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 09:19 AM2018-10-19T09:19:02+5:302018-10-19T09:21:36+5:30
Cyclone Titli Update: बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे. या चक्रीवादळामध्ये आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे.
भुवनेश्वर - बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे. या चक्रीवादळामध्ये आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे. पाऊस आणि वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी (11 ऑक्टोबर) तितली चक्रीवादळ हे ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले होते त्यानंतर या परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला.
Total 57 people have died & 57,131 houses damaged due to #TitliCyclone and subsequent flood&landslide in the state, till now: Special Relief Commissioner (SRC). #Odisha (18.10.2018)
— ANI (@ANI) October 19, 2018
ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काही दिवस शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच आतापर्यंत जवळपास लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी परिस्थितीची माहिती घेतली असून त्यांनी गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यातील कलेक्टरांना तटवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची घरं तातडीने रिकामी करण्यास सांगितलं होते. तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी निवारागृहे उभारण्यास सांगण्यात आले आहे.