पुढच्या काही तासांत बुलबुल चक्रीवादळ धारण करणार रौद्र रूप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 10:39 PM2019-11-07T22:39:29+5:302019-11-07T22:40:19+5:30
बंगालच्या उपसागरामध्ये बुलबुल चक्रिवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ पुढच्या काही तासांमध्ये रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे.
कोलकाता - बंगालच्या उपसागरामध्ये बुलबुल चक्रिवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ पुढच्या काही तासांमध्ये रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा फटका ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता असून, खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची पथके तैनात करण्यात येत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलबुल चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या संकटाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर पंतप्रधानांचे मुख्य सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी ओदिशा, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान निकोबारच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी काय तयारी केली आहे याचा आढावा घेण्यात आला.
India Meteorological Department (IMD): Cyclonic storm Bulbul intensified into a 'Severe' cyclonic storm at 5:30 pm today. #CycloneBulbulhttps://t.co/NoKPqIIzZH
— ANI (@ANI) November 7, 2019
या यंदर्भात केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले की, या बैठकीत बुलबुल चक्रीवादळाच्या सुरुवातीच्या काही तासांमधील परिणामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आयएमडीच्या महासंचालकांनी बुलबुल चक्रीवादळासंदर्भात विस्तृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बुलबुल चक्रीवादळाच्या प्रभावक्षेत्रात ७० ते ८० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. तर चक्रीवादळाच्या केंद्रस्थानी ९० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.