चार एलईडींसह सिलिंडर हस्तगत गुन्हे शाखा : तिघा सराईत चोरट्यांना अटक

By admin | Published: August 24, 2016 11:17 PM2016-08-24T23:17:08+5:302016-08-24T23:26:37+5:30

नाशिक : गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून पोलिसांनी तिघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Cylinder Graft Crime Branch with Four LEDs: Three Soldiers Thieves | चार एलईडींसह सिलिंडर हस्तगत गुन्हे शाखा : तिघा सराईत चोरट्यांना अटक

चार एलईडींसह सिलिंडर हस्तगत गुन्हे शाखा : तिघा सराईत चोरट्यांना अटक

Next

नाशिक : गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून पोलिसांनी तिघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, प्रदीप जगन्नाथ तुपे (२१, रा.चुंचाळे), सतीश सदाशिव भांगरे (रा. शिवाजीनगर), महेश बळीराम शिरसाठ (२०, रा. गोवर्धन गाव) या तिघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता चोरी केलेल्या ऐंशी हजार रुपये किमतीच्या २१ ते ३२ इंच सॅमसंग कंपनीच्या चार एलईडी टीव्ही, सहा हजार रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे चार रिकामे सिलिंडर, पाच हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅमचे चांदीचे जोडव्यांचे चार नग असा एकूण ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तिघे सराईत गुन्हेगार आनंदवल्ली परिसरात येणार असल्याची कुणकुण गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागली होती. त्यानुसार पो.हवालदार रवींद्र पिंगळे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सापळा रचण्यात आला. पोलीस निरीक्षक आनंद वाघ, रवींद्र साळुंखे, संजय तांदूळवाकर, उपनिरीक्षक राजेंद्र जाधव आदिंनी ही कारवाई केली.
-------
फोटो आर वर २२पोलीस नावाने लोड आहे.

Web Title: Cylinder Graft Crime Branch with Four LEDs: Three Soldiers Thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.