Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर सरकार सतर्क; 'हे' प्रोडक्ट विकण्यावर घातली बंदी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 07:13 PM2022-09-08T19:13:50+5:302022-09-08T19:14:00+5:30

Cyrus Mistry Death: सरकारने Amazon ला एक आदेश जारी केला असून, एक खास प्रोडक्ट विकण्यावर बंदी घातली आहे.

Cyrus Mistry Death: after Cyrus Mistry's accident Government Ban on selling 'Seatbelt Alarm Blockers' | Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर सरकार सतर्क; 'हे' प्रोडक्ट विकण्यावर घातली बंदी...

Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर सरकार सतर्क; 'हे' प्रोडक्ट विकण्यावर घातली बंदी...

googlenewsNext

Cyrus Mistry Car Accident: नुकतेच टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे कार अपघातात निधन झाले. टाटा समुहाचे अध्यक्षपद आणि त्यानंतर झालेल्या वादामुळे सायरस मिस्त्री नेहमीच चर्चेत असायचे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, आपल्या कारमध्ये मागे बसलेल्या सायरस यांनी सीटबेल्ट न लावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या अपघातानंतर आता सीटबेल्टच्या महत्त्वावर बरीच चर्चा होत आहे. यातच आता सरकारने शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनसाठी(Amazon)  एक खास आदेश जारी केला असून एका विशिष्ट उत्पादनाच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

सरकारने अॅमेझॉनसाठी जारी केला आदेश
या आधीही भारतात सीटबेल्ट न लावल्यामुळे अनेक भीषण अपघात झाले आहेत. पण, आता मिस्त्री यांच्या अपघातानंतर सीट बेल्टची गरज आणि महत्त्व यावर बरीच चर्चा होत आहे. यातच सरकारने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon साठी एक आदेश जारी केला आहे. परिवहन मंत्री नितीन गडकरी  (Nitin Gadkari) यांनी केवळ नियमच जारी केले नाहीत, तर एका उत्पादनाच्या विक्रीवरही बंदी घातली आहे.

हे उत्पादन विकण्यास मनाई
नितीन गडकरी यांनी Amazon ला त्यांच्या साइटवर सीटबेल्ट अलार्म ब्लॉकर्सची(Seatbelt Alarm Blockers) विक्री थांबवण्यासाठी आदेश जारी केला आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, बरेच लोक अॅमेझॉनवरून क्लिप खरेदी करतात, ज्याचा वापर सीट बेल्ट अलार्म ब्लॉक करण्यासाठी केला जातो. या उत्पादनाची विक्री थांबवण्यासाठी अॅमेझॉनला नोटीस पाठवली आहे. NCRB 2021 च्या अहवालानुसार, भारतात रस्ते अपघातांमुळे 1,55,622 मृत्यू झाले आहेत आणि त्यापैकी 69,240 अपघात हे दुचाकी वाहनांमुळे झाले आहेत.

 

Web Title: Cyrus Mistry Death: after Cyrus Mistry's accident Government Ban on selling 'Seatbelt Alarm Blockers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.