कंपन्यांचे बाजारमूल्य वाढवूनही सायरस मिस्त्रींना 'टाटा'

By admin | Published: October 25, 2016 12:50 PM2016-10-25T12:50:35+5:302016-10-25T19:17:57+5:30

सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन हटवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या नेतृत्वाखाली कंपन्यांच्या बाजारमूल्यामध्ये...

Cyrus Mistry to get 'Tata' | कंपन्यांचे बाजारमूल्य वाढवूनही सायरस मिस्त्रींना 'टाटा'

कंपन्यांचे बाजारमूल्य वाढवूनही सायरस मिस्त्रींना 'टाटा'

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २५ - नफ्यात झालेली घट तसेच अन्य कारणांमुळे सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन हटवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या नेतृत्वाखाली कंपन्यांच्या बाजारमूल्यामध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. 
 
कुठल्याही कंपनीच्या आर्थिक प्रगतीचे प्रतिबिंब त्या कंपनीच्या शेअर्सच्या  बाजारमूल्यामध्ये उमटते. म्हणजेच, चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांच्या शेअरचे भाव वधारतात आणि बाजारमूल्य वधारते.  2012 मध्ये रतन टाटा यांनी अध्यक्षपद सोडले तेव्हा या समूहाचे बाजारमूल्य ४.६२ लाख कोटी रुपये होते. 
 
तर, सायरस मिस्त्री यांच्या सुमारे साडेतीन वर्षांच्या कालावधीत समूहाचे बाजारमूल्य ८.५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मिस्त्री यांच्या कालावधीत समूहातील कंपन्यांचे बाजारमूल्य चारपटींनी वाढले तर रतन टाटा यांच्या २१ वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत ते ५७ पटींनी वाढले होते. 

Web Title: Cyrus Mistry to get 'Tata'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.