द.चीन सागरातील बेटावर चीनचे विमान उतरल्याने तणाव

By admin | Published: January 5, 2016 11:23 PM2016-01-05T23:23:22+5:302016-01-05T23:23:22+5:30

चीनने प्रथमच दक्षिण चीन सागरातील कृत्रिम बेटावर आपले विमान उतरविले आहे. त्यामुळे या प्रदेशात तणाव निर्माण झाला असून, अमेरिकेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

D. Tensions between Chinese aircraft landing on the island of China | द.चीन सागरातील बेटावर चीनचे विमान उतरल्याने तणाव

द.चीन सागरातील बेटावर चीनचे विमान उतरल्याने तणाव

Next

हाँगकाँग : चीनने प्रथमच दक्षिण चीन सागरातील कृत्रिम बेटावर आपले विमान उतरविले आहे. त्यामुळे या प्रदेशात तणाव निर्माण झाला असून, अमेरिकेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
या वादग्रस्त प्रदेशात चीनने कृत्रिम बेट तयार केले असून, त्यावरील सर्व पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण केल्या. आता तेथे चीनची लष्करी विमाने नियमितपणे उतरत आहेत. या भागात चीन आपली लष्करी शक्ती सतत वाढवीत आहे. त्यातही हवाई शक्तीत चीनचे वर्चस्व वाढत आहे.
या प्रदेशावर अन्य काही देश दावे करीत आहेत. त्यांच्या बाजूने अमेरिका उतरली आहे. त्यामुळे एक प्रकारे चीनविरुद्ध अमेरिका असा संघर्ष उभा राहिला आहे.
चाचणीसाठी या कृत्रिम बेटावरील हवाई पट्टीवर शनिवारी एक विमान उतरल्याचे चिनी अधिकाऱ्याने सांगितले. या धावपट्टीवरील रनवेचा प्रथमच वापर करण्यात आला.चीनच्या या घोषनेनंतर व्हिएतनामने आपला अधिकृत निषेध नोंदविला.(वृत्तसंस्था)
तर फिलिपाईन्सनेही तीव्र प्रतिक्रिया देताना चीनच्या या कृतीने या भागात अस्थिरता वाढेल, असे म्हटले आहे.

Web Title: D. Tensions between Chinese aircraft landing on the island of China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.