केंद्रीय कर्मचा-यांचा डीए ७ % वाढणार
By admin | Published: September 1, 2014 04:06 AM2014-09-01T04:06:09+5:302014-09-01T04:15:57+5:30
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) ७ टक्के वाढण्याची शक्यता आहे. याबरोबरच महागाई भत्ता १०० टक्क्यांवरून १०७ टक्क्यांवर जाईल.
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) ७ टक्के वाढण्याची शक्यता आहे. याबरोबरच महागाई भत्ता १०० टक्क्यांवरून १०७ टक्क्यांवर जाईल. या निर्णयाचे ३० लाख कर्मचारी, पेन्शनधारक व त्यांच्या अवलंबितांसह ५० लाख लाभार्थी असतील. ही वाढ १ जुलैपासून देण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
एक जुलै २०१३ ते ३० जून २०१४ या कालावधीसाठी औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता ७.२५ टक्के वाढीसह देण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना ७ टक्के वाढ देणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. कामगार मंत्रालयाने औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी महागाई दर काल जाहीर केला होता. सरकारी कर्मचारी मात्र या ७ टक्के वाढीच्या निर्णयामुळे फारसे उत्साही नाहीत. कारण त्यांची मागणी महागाई भत्ता हा मूळ वेतनात समाविष्ट करण्याची आहे.