DA Hike: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, महागाई भत्त्यात 3% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 02:54 PM2022-03-30T14:54:55+5:302022-03-30T15:01:43+5:30

DA Hike: 1 जानेवारी 2022 पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा देशभरातील 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.

DA Hike: Modi government's big gift to central govt employees, 3% increase in dearness allowance | DA Hike: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, महागाई भत्त्यात 3% वाढ

DA Hike: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, महागाई भत्त्यात 3% वाढ

Next

नवी दिल्ली: देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जानेवारी 2022 पासून केंद्र सरकारचेकर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) मध्ये 3% वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 28% वरुन 31% करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा
सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 31 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. मात्र सरकारने त्यात 3 टक्क्यांनी वाढ करुन 34 टक्के केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पगारासह नवीन महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम दिली जाईल. एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांना मागील 3 महिन्यांची सर्व थकबाकीही दिली जाणार आहे. 3 टक्के महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 73,440 रुपयांपासून 2,32,152 रुपयांपर्यंतच्या थकबाकीचा लाभ मिळणार आहे.

लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे
एका अंदाजानुसार, महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 10,000 कोटी रुपयांचा बोजा पडेल. या निर्णयामुळे 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. वास्तविक, होळीपूर्वीच सरकार महागाई भत्त्यात वाढ जाहीर करेल, असे मानले जात होते, मात्र आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: DA Hike: Modi government's big gift to central govt employees, 3% increase in dearness allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.