मरीन ड्राईव्हवर जोडप्यांना दबंग शिवसैनिकांचा त्रास

By admin | Published: March 9, 2017 02:26 PM2017-03-09T14:26:40+5:302017-03-09T14:28:00+5:30

नैतिकचे पहारेकरी असल्याचा कांगावा करत काही शिवसैनिकांनी मरीन ड्राईव्ह येथे बसलेल्या प्रेमी युगुलांना तेथून पळवून लावलं.

Dabang Shivsainik's troubles on the Marine Drive couples | मरीन ड्राईव्हवर जोडप्यांना दबंग शिवसैनिकांचा त्रास

मरीन ड्राईव्हवर जोडप्यांना दबंग शिवसैनिकांचा त्रास

Next

ऑनलाइन लोकमत

केरळ, दि. 9 -  नैतिकचे पहारेकरी असल्याचा कांगावा करत काही शिवसैनिकांनी मरीन ड्राईव्ह येथे बसलेल्या प्रेमी युगुलांना तेथून पळवून लावलं. केरळमधील कोची येथील शिवसैनिकांचा हा दबंगगिरीचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मरीन ड्राईव्ह येथे काही प्रेमी युगुल बसले होते. यावेळी शिवसेनेचे काही कार्यकर्ते लाठ्या-काठ्यांसहीत तेथे आले, व गोंधळ घालत त्यांनी तेथे बसलेल्या प्रेमीयुगुंलाना हुसकावून लावायला सुरुवात केली. 
 
(आता मोदी सरकार भरणार तुमच्या घराचं भाडं)
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पोलीस कर्मचारी आणि प्रसिद्धी माध्यमंही घटनास्थळी हजर होते. मात्र त्यांना न घाबरता शिवसैनिकांनी आपला धुडगुस सुरूच ठेवला. दरम्यान, या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात असून 8 पोलीस कॉन्स्टेबल्सची बदली करण्यात आली आहे. 
(UP Election 2017 : आज जाहीर होणारे एक्झिट पोल शास्त्र की जुगार)
 
बुधवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 'Stop Love Under Umbrella' या बॅनरअंतर्गत मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी मरीन ड्राईव्ह येथे बसलेल्या प्रेमीयुगुलांना त्रास द्यायला सुरुवात केली. हातात लाठ्या-काठ्या घेत जोडप्यांचा पाठलाग करुन काहींना पळवून लावलं तर काही धमकीही दिली. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, परवानगीशिवाय मोर्चा काढणं या आरोपांतर्गत या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 (VIDEO : बाईकसहीत मालकालाही केले टो)
 
काही दिवसांपूर्वी शिवसेना कार्यकर्त्यांनी तरुण-तरुणींना मरीन ड्राईव्ह येथे बसू नका, असा इशारा दिला होता. दरम्यान, या घटनेचा सत्ताधारी माकपा आणि विरोधीपक्ष काँग्रेसने निषेध केला आहे. 
 

Web Title: Dabang Shivsainik's troubles on the Marine Drive couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.