दबंग IAS अधिकाऱ्यामुळं नरकयातना भोगणाऱ्या 50 मुलींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:53 PM2019-01-24T16:53:38+5:302019-01-24T16:54:24+5:30
येथील एका शेल्टर होममध्ये लहान मुलींचा अमानुष छळ करण्यात येत होता. येथे राहणाऱ्या वयवर्षे 5 पासून ते 22 वर्षांपर्यंतच्या मुलींच्या बाथरुमला दरवाजेही नव्हते.
चेन्नई - तामिळनाडूतील एका मिशनरी होममधून लैंगिक शोषण करण्यात येणाऱ्या 50 मुलींची सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर, या मुलींना सुरक्षितस्थळी ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी केएस कंडासामी यांनी दिली. कंडासामी हे तिरुवन्नमलाई येथे जिल्हाधिकारी आहे. एका मशिनरी होममधून त्यांनी 50 मुलींची सुटका करत दबंग अधिकारी असल्याचं दाखवून दिलंय.
येथील एका शेल्टर होममध्ये लहान मुलींचा अमानुष छळ करण्यात येत होता. येथे राहणाऱ्या वयवर्षे 5 पासून ते 22 वर्षांपर्यंतच्या मुलींच्या बाथरुमला दरवाजेही नव्हते. एका सार्वजनिक रुममध्येच त्यांना कपडे बदलावे लागत होते. तर महिला स्टाफऐवजी तेथे केवळ एकच पुरुष सुरक्षा रक्षक ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे तक्रार करणाऱ्या मुलींना मारहाण करण्यता येत होती. येथील मुलींचे शारिरीक शोषणही करण्यात येत होते. या मुलींवरील अन्याय-अत्याचाराची कहानी ऐकून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल, असेच कृत्य होत. मात्र, जिल्हाधिकारी कंडासामी यांना मर्सी अदाइकालापुरम मिशनरी होमबाबत तक्रार मिळाली. त्यानंतर, त्यांनी थेट मिशनरी होमवरच धाड टाकली. त्यावेळी या घराचा मालक 65 वर्षीय लुबान कुमार कुटुंबासमवेत तेथेच राहत असल्याचे दिसले. तर, त्याने जाणीवपूर्वक मुलींच्या बाथरुमचे दरवाजे काढल्याचेही लक्षात आले. विशेष म्हणजे लुबानचा कॅमेरा मुलींच्या रुममध्ये छायाचित्रण टिपत होता. सोबतच, रात्रीच्यावेळी येथील काही मुलींना तो मसाज करण्यासाठी आपल्याकडे बोलावून घेत होता. याप्रकरणी चौकशी करुन कंडासामी यांनी लुबान यास तुरुंगात धाडले आहे. तसेच पोस्को कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.