दबंग सलमानला सुप्रीम कोर्टाचा दणका, शिक्षेवरील स्थगिती उठवली
By admin | Published: January 14, 2015 11:03 AM2015-01-14T11:03:17+5:302015-01-14T11:09:59+5:30
अभिनेता सलमान खानला बुधवारी सुप्रीम कोर्टाने जोरदार दणका दिला आहे. १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणातील शिक्षेला राजस्थान हायकोर्टाने दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - अभिनेता सलमान खानला बुधवारी सुप्रीम कोर्टाने जोरदार दणका दिला आहे. १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणातील शिक्षेला राजस्थान हायकोर्टाने दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. हायकोर्टाने सलमानच्या याचिकेवर फेरविचार करुन निर्णय घ्यावा असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
१९९८ मध्ये एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अभिनेता सलमान खानने राजस्थानमध्ये काळवीटची शिकार केल्याचे उघड झाले होते. यासंदर्भात सलमान खानला राजस्थानमधील कनिष्ठ न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. मात्र राजस्थान हायकोर्टाने या शिक्षेला स्थगिती दिल्याने सलमान खानला मोठा दिलासा मिळाला होता. या निर्णयाला राजस्थान सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने राजस्थान हायकोर्टाने शिक्षेला दिलेली स्थगिती उठवली आहे. तसेच सलमान खानच्या याचिकेवर हायकोर्टाने पुनर्विचार करुन अंतिम निर्णय घ्यावा असे सांगत सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुन्हा राजस्थान हायकोर्टाकडे पाठवले.
काळवीट शिकार प्रकरणात शिक्षा झाल्याने अभिनेता सलमान खानच्या परदेशवारींवर बंधन आले होते. परदेशातील कडक नियमांमुळे सलमान खानला ब्रिटनचा व्हिसा मिळू शकला नव्हता.