दादरी हत्याकांड पूर्वनियोजित - अल्पसंख्याक आयोग

By admin | Published: October 21, 2015 02:06 PM2015-10-21T14:06:53+5:302015-10-21T14:06:53+5:30

दादरीमधल्या बिसखडा गावातल्या मोहम्मद अखलाखची झालेली हत्या ही उस्फूर्त नसून हा पूर्वनियोजित हल्ला होता असा निष्कर्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने काढल्याचे वृत्त

Dadri assassination premeditated - minority commission | दादरी हत्याकांड पूर्वनियोजित - अल्पसंख्याक आयोग

दादरी हत्याकांड पूर्वनियोजित - अल्पसंख्याक आयोग

Next
>ऑनलाइन लोकमत
दादरी, (उत्तर प्रदेश), दि. २१ - दादरीमधल्या बिसखडा गावातल्या मोहम्मद अखलाखची झालेली हत्या ही उस्फूर्त नसून हा पूर्वनियोजित हल्ला होता असा निष्कर्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने काढल्याचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे. दादरीमध्ये बीफ बाळगल्याच्या अफवेवरून अखलाखची ५० ते १०० जणांच्या जमावाने हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर देशभरात निषेधाची लाट उसळली. अनेक नेत्यांनी परस्परविरोधी व आगलाऊ वक्तव्ये करत वातावरण तप्त ठेवले होते. या घटनेची दखल घेत १५ ऑक्टोबर रोजी अल्पसंख्याक आयोगाच्या फरीदा खान, नसीम अहमद व सेरींग शानू या तीन सदस्यांनी दादरीला भेट दिली. त्यांनी आज हा अहवाल प्रसिद्ध केला असून टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि त्यामध्ये उत्स्फूर्तता नव्हती.
रात्रीच्यावेळी अत्यंत थोड्या कालावधीत इतका मोठा जमाव कसा जमा होऊ शकतो असा प्रश्न फरीदा खान यांनी उपस्थित केला आहे. तसेच सोशल मीडियावर अत्यंत जहाल प्रचार करून वातावरण कलुषित करण्यात आले होते असेही त्यांनी अहवालात नमूद केले आहे.

Web Title: Dadri assassination premeditated - minority commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.