दादरी हत्याकांड: इखलाखच्या कुटुंबाला आणखी तपास नको

By admin | Published: December 7, 2015 10:40 AM2015-12-07T10:40:09+5:302015-12-07T10:44:13+5:30

दादरी हत्याकांडप्रकरणाचा आणखी तपास करण्यात येऊ नये अशी मागणी मोहम्मद इखलाखच्या कुटुंबियांनी केली

Dadri murder: Ikhlakh's family does not have any further investigations | दादरी हत्याकांड: इखलाखच्या कुटुंबाला आणखी तपास नको

दादरी हत्याकांड: इखलाखच्या कुटुंबाला आणखी तपास नको

Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. ७ - बीफ खाल्ल्याच्या व साठवून ठेवल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या मोहम्मद इखलाखच्या कुटुंबियांना अचानक माघार घेत याप्रकरणाचा यापुढे आणखी तपास न करण्याची मागणी केली आहे. इतके दिवस 'दादरी प्रकरणाच्या सीबीआय तपासाची मागणी करणा-या मोहम्मद इखलाखच्या कुटुंबियांना रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर ही मागणी केली आहे. दादरी प्रकरणी आत्तापर्यंत झालेला तपास व कारवाईबद्दल इखलाखच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.
सुमारे दोन ते तीन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील दादरी येथील बिसाहडा गावातील जमावाने बीफ खाल्ल्याच्या संशयावरून इखलाख व त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इखलाखचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशात बराच काळ तणावाचे वातावरण होते. केंद्र सरकारने याप्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. राष्ट्रपती व पंतप्रधानांनीही याप्रकरणी दु:ख व्यक्त केले होते तर उत्तर प्रदेश सरकारच्या अहवालात या प्रकरणात सांप्रदायिक हिंसेचा उल्लेख नसल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले होते.

Web Title: Dadri murder: Ikhlakh's family does not have any further investigations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.