Independence Day 2021 : "देशातील विविध भागांना जोडणाऱ्या 75 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार"; मोदींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 09:28 AM2021-08-15T09:28:19+5:302021-08-15T09:36:27+5:30

Celebrating Happy Independence Day 2021 : पंतप्रधानांनी आपल्या भाषणादरम्यान एक मोठी घोषणा केली आहे.

"देशातील विविध भागांना जोडणाऱ्या 75 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार" | Independence Day 2021 : "देशातील विविध भागांना जोडणाऱ्या 75 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार"; मोदींची मोठी घोषणा

Independence Day 2021 : "देशातील विविध भागांना जोडणाऱ्या 75 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार"; मोदींची मोठी घोषणा

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून स्वातंत्र्य दिन सोहळ्यास (Happy independence day 2021) सुरुवात केली आहे. 'हे वर्ष नवीन ऊर्जा, चेतना घेऊन येईल' असं म्हणत मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!" असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणादरम्यान एक मोठी घोषणा केली आहे. "देशातील विविध भागांना जोडणाऱ्या 75 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार" असल्याचं म्हटलं आहे. 

"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 आठवडे चालणाऱ्या कार्यक्रमांदरम्यान देशातील विविध भागांना 75 वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून जोडणार" असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. "देशातील लहान शेतकरी हा देशाची शान ठरावा हे आमचे स्वप्न आहे.  येणाऱ्या वर्षांमध्ये देसातील लहान शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीला अधिक वाढवावे लागेल. त्यांना अधिक सुविधा द्याव्या लागतील. भारत पुढच्या काही काळामध्ये प्रधानमंत्री गति शक्तीचा नॅशनल मास्टर प्लॅन देशासमोर ठेवणार आहे. 100 लाख कोटीपेक्षा अधिकच्या या योजनेच्या माध्यमातून लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हा असा मास्ट्र प्लॅन असेल, जो हॉलिस्टिक इंफ्रास्ट्रक्चरची पायाभरणी करेल" असं ही म्हटलं आहे. 

देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश मिळणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा केली आहे. "आज देशाजवळ 21 व्या शतकातील आवश्यकतांची पूर्तत करण्यासाठी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे. गरीबांची मुले मुली मातृभाषेत शिकून प्रोफेशनल्स बनतील तेव्हा त्यांच्या सामर्थ्यासोबत न्याय होईल. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण गरिबीविरोधातील लढाईचे साधन असल्याचे मला वाटते. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची एक अजून महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये स्पोर्ट्सला एक्स्ट्रा करिक्युलर ऐवजी मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा भाग बनवण्यात आले आहे. जीवनात पुढे जायचे असेल तर त्यामध्ये क्रीडा हेसुद्धा महत्त्वाचे प्रभावी माध्यम आहे" असं म्हटलं आहे. 

'जर आपल्याकडे स्वत:ची लस नसती तर…'; पंतप्रधानांनी केलं लसीकरण मोहिमेचं कौतुक

कोरोना संकटात देशात होत असलेल्या लसीकरण (Corona Vaccine) मोहिमेचा मोदींनी आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला आहे. "विकासाच्या मार्गावरून चालत असतानाच देशासमोर कोरोनाचे संकट आले. देशवासियांनी संयम आणि धैर्याने संकटाचा सामना केला आहे. कोरोनाविरोधाच्या लढाईत आम्ही सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत देशातील 54 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे" असं म्हटलं आहे. "आपल्या संशोधकांच्या ताकदीचा हा परिणाम आहे. म्हणूनच भारताला कोरोना लसीसाठी इतर कोणत्या देशावर अवलंबून राहावं लागलं नाही. तुम्ही कल्पना करा की जर भारताकडे स्वत:ची लस नसती, तर काय झालं असतं? पोलिओची लस मिळवण्यात आपले किती वर्ष निघून गेले. एवढ्या संकटात जगात महामारी असताना आपल्याला लस कधी मिळाली असती? पण आज अभिमानाने सांगता येतं की जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.


 

Web Title: "देशातील विविध भागांना जोडणाऱ्या 75 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.