Corona vaccination in India : ऑक्टोबरमध्ये दररोज 1 कोटी लोकांचे लसीकरण होणार; केंद्र सरकार 28 कोटी डोस खरेदी करणार, सुत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 10:33 PM2021-09-30T22:33:20+5:302021-09-30T22:33:51+5:30

Corona vaccination in India : देशात आतापर्यंत 88 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. 18 सप्टेंबर रोजी देशात 2.5 कोटी डोस देण्यात आले.

Daily 1 crore vaccination in India likely in October; The central government will buy 28 crore doses, sources said | Corona vaccination in India : ऑक्टोबरमध्ये दररोज 1 कोटी लोकांचे लसीकरण होणार; केंद्र सरकार 28 कोटी डोस खरेदी करणार, सुत्रांची माहिती

Corona vaccination in India : ऑक्टोबरमध्ये दररोज 1 कोटी लोकांचे लसीकरण होणार; केंद्र सरकार 28 कोटी डोस खरेदी करणार, सुत्रांची माहिती

Next

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात देशात कोरोना लसीकरणाचा वेग (Covid-19 Vaccination) आणखी वाढू शकतो. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, केंद्र सरकार ऑक्टोबर महिन्यात 27 ते 28 ऑक्टोबरला लसीचे डोस खरेदी करू शकते. सरकार हे डोस सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून खरेदी करेल. सूत्रांनुसार, हे डोस बायलॉजिकल ई आणि झायडस कॅडिला लसींव्यतिरिक्त असतील. सप्टेंबर महिन्यात सरकारने 25 कोटी डोस खरेदी केले होते.

यापूर्वी, एएनआयने रिपोर्टमध्ये म्हटले होते की, 15 ऑक्टोबरपूर्वी 100 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे हे लक्ष्य 10-12 ऑक्टोबरपर्यंत साध्य केले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर देशात फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोविड वॉरियर्स यांच्या सन्मानार्थ जंगी सोहळा आयोजित केला जाणार आहे.

आतापर्यंत 88 कोटींहून अधिक लसीचे डोस
देशात आतापर्यंत 88 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. 18 सप्टेंबर रोजी देशात 2.5 कोटी डोस देण्यात आले. हा एक जागतिक विक्रम आहे. वर्षाच्या अखेरीस 94 कोटी लोकांचे संपूर्ण लसीकरण करण्यात यश येईल, असे केंद्र सरकारला वाटते. न्यूज 18 मधील एका रिपोर्टनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले होते की, 94 कोटी नागरिकांना लसीकरण करण्यासाठी 188 कोटी डोस पुरेसे आहेत, जे डिसेंबरच्या अखेरीस उपलब्ध केले जातील. गेल्या एका महिन्यात देशात सुमारे 23 कोटी लसी देण्यात आल्या आहेत, ज्या इतर कोणत्याही महिन्याच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत.

एक कोटी डोस दररोज
याआधी असे म्हटले आहे की, दररोज एक कोटी लसीकरणाची तयारी केली पाहिजे. आता सरकार घेत असलेल्या लसीच्या डोसची संख्या पाहता असे म्हणता येईल की, ऑक्टोबर महिन्यात जवळपास एक कोटी लसीकरण दररोज होऊ शकते. आतापर्यंत देशात एक कोटीहून अधिक लसीकरण 5 वेळा केले गेले आहे. प्रत्येकवेळी हे ध्येय अत्यंत सहजपणे साध्य झाले आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबरमध्येही हा आकडा गाठता येईल. केंद्र सरकार सातत्याने दावा करत आहे की, डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण केले जाईल. आता लसीकरणाचा वेग पाहता हा आकडा योग्य असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भारत ऑक्टोबरपासूनच लसीची निर्यात पुन्हा सुरू करू शकतो.

Web Title: Daily 1 crore vaccination in India likely in October; The central government will buy 28 crore doses, sources said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.