दलाई लामांनी उत्तराधिकारी शोधला; अमेरिकी मंगोलियाई मुलगा बनला बौद्ध धर्माचा तिसरा मोठा धर्मगुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 01:09 PM2023-03-25T13:09:40+5:302023-03-25T13:09:56+5:30

दलाई लामा यांनी 2016 मध्ये मंगोलियाला भेट दिली होती. तेव्हाच लामा यांनी बौद्ध धर्मातील तिसरे सर्वात महत्वाचे लामा यांचा मंगोलियात पुनर्जन्म झाल्याचे म्हटले होते.

Dalai Lama seeks successor; American Mongolian boy s new Buddhist spiritual leader | दलाई लामांनी उत्तराधिकारी शोधला; अमेरिकी मंगोलियाई मुलगा बनला बौद्ध धर्माचा तिसरा मोठा धर्मगुरु

दलाई लामांनी उत्तराधिकारी शोधला; अमेरिकी मंगोलियाई मुलगा बनला बौद्ध धर्माचा तिसरा मोठा धर्मगुरु

googlenewsNext

ल्हासा: गेल्या अनेक वर्षांपासून चीनचा तिबेटवर डोळा आहे. त्यातच चीनला टक्कर देणारे बौद्ध धर्माचे नेते दलाई लामा यांच्यानंतर कोण असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यात चीन ढवळाढवळ करत होता. असे असताना दलाई लामांनी चीनला मोठा धक्का दिला आहे. 

दलाई लामांनी आपला उत्तराधिकारी शोधला आहे. दलाई लामांनी अमेरिकी मंगोलियाई मुलाला तिबेटी बौद्ध धर्माचा तिसरा महत्वाचा अध्यात्मिक नेता म्हणून निवडले आहे. या कार्यक्रमाला जवळपास ६०० हून अधिक मंगोलियाई सदस्य जमले होते. या कार्यक्रमानंतर फोटो जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये लामा एका मुलाला वस्त्र आणि मास्क घालताना दिसत आहेत. 

मुलाचे वय ८ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगोलियन मीडिया रिपोर्ट्स नुसार हा मुलगा जुळ्या मुलांपैकी एक आहे. 0 व्या खलखा जेत्सून धम्पा रिनपोचे यांचा पुनर्जन्म झाल्याचे लामा यांनी म्हटले आहे. बौद्ध धर्मात धार्मिक नेत्यांच्या पुनर्जन्माला विशेष महत्त्व दिले जाते. हिमाचल प्रदेश येथे धार्मिक नेत्याचा पुनर्जन्म सोहळा आयोजित करण्यात आला होता. दलाई लामाही धर्मशाळा येथे राहतात. 

दलाई लामा यांनी 2016 मध्ये मंगोलियाला भेट दिली होती. यावेळी चीन मंगोलियावर नाराज झाला होता. चीन-मंगोलियन संबंधांवर नकारात्मक परिणाम झाल्याचे चिनी सरकारने म्हटले होते. तेव्हाच लामा यांनी बौद्ध धर्मातील तिसरे सर्वात महत्वाचे लामा यांचा मंगोलियात पुनर्जन्म झाल्याचे म्हटले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. आता निवडलेला मुलगा हा अगुईडाई आणि अचिल्टाई अल्तानार या जुळ्या मुलांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: Dalai Lama seeks successor; American Mongolian boy s new Buddhist spiritual leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.