#AmritsarTrainAccident : ... आणि रावणाने घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 11:35 AM2018-10-20T11:35:22+5:302018-10-20T11:50:19+5:30
रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या एका व्यक्तीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
अमृतसर : अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (19 ऑक्टोबर) रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या एका व्यक्तीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. दलबीर सिंह असं मृत व्यक्तीचं नाव असून रावण दहनावेळी तो रुळावर उपस्थित होता.
#Amritsar: Dalbir Singh (pic 1), who played the role of Ravan in a Ramlila in the city during Dussehra celebrations, died in #AmritsarTrainAccident, yesterday. His mother (pic 3) says, "I appeal to the govt to provide a job to my daughter-in law. She also has a 8-month old baby." pic.twitter.com/MFDHVhwf4G
— ANI (@ANI) October 20, 2018
#AmritsarTrainAccident : हा नियतीचा घाला, दुर्घटनेचं राजकारण नको - नवज्योतसिंग सिद्धू
दलबीरच्या मृत्युमुळे त्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. तो आता या जगात नाही या गोष्टीवर त्यांच्या पत्नीचा आणि आईचा विश्वासच बसत नाही. दलबीर अनेक वर्षांपासून रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारत असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. रावण दहनाच्या दिवशीच त्याचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. तसेच या अपघाताला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.