दलित कुटुंबाला पेट्रोल ओतून जाळले

By admin | Published: October 21, 2015 04:34 AM2015-10-21T04:34:23+5:302015-10-21T04:34:23+5:30

देशात दादरी हत्याकांडाचे पडसाद उमटत असतानाच राजधानी दिल्लीलगतच्या हरियाणामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना घडली. एका दलित

The Dalit family burnt the petrol pumps | दलित कुटुंबाला पेट्रोल ओतून जाळले

दलित कुटुंबाला पेट्रोल ओतून जाळले

Next

हरियाणात माणुसकीला काळिमा : दोन निष्पाप बालकांचा होरपळून मृत्यू; ११ जणांवर गुन्हा

फरिदाबाद (हरियाणा) : देशात दादरी हत्याकांडाचे पडसाद उमटत असतानाच राजधानी दिल्लीलगतच्या हरियाणामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना घडली. एका दलित कुटुंबाला मंगळवारी पहाटे पेट्रोल ओतून जाळण्यात आले. सवर्णांनी घडवून आणलेल्या या अग्निकांडात दोन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला तर त्यांचे मातापिता मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारने पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
हृदय पिळवटून टाकणारी ही घटना दिल्लीपासून जवळच असलेल्या सुनपेड गावात पहाटे २.३० वाजताच्या दरम्यान घडली. हल्लेखोरांनी एका घराला पेट्रोल ओतून आग लावल्याने या घरात आपल्या मातापित्यांसह शांत झोपलेला अडीच वर्षांचा वैभव आणि त्याची ११ महिन्यांची बहीण दिव्या जिवंत जळाले. त्यांची आई रेखा (वय २८) ७० टक्के जळाली असून, वडील जितेंद्रसिंग हेसुद्धा कुटुंबाला वाचविण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाले. (वृत्तसंस्था)

अशा घटनांची पुनरावृत्ती नको - राजनाथसिंह
नवी दिल्ली : जातीय संघर्षात दलित कुटुंबाला जाळण्यात आल्याच्या घटनेची केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना तातडीने दूरध्वनी करून प्रत्येक नागरिकाला संरक्षण आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना केली.

जुन्या भांडणाचा बदला...
हल्लेखोर हे राजपूत जातीचे होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत आपले भांडण झाले होते. गावात परतलात तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकू, अशी धमकी त्यांनी दिली होती.
- जितेंद्रसिंग, पीडित

Web Title: The Dalit family burnt the petrol pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.