चिमुरडा हनुमान मंदिरात गेला; दलित कुटुंबाला २३ हजारांचा दंड भरावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 08:45 PM2021-09-22T20:45:33+5:302021-09-22T20:49:07+5:30

लहान मुलामुळे मंदिर अपवित्र झाल्याचा उच्च जातीतल्या लोकांचा दावा

Dalit family fined Rs 23K after 2 year old son enters temple in Karnataka | चिमुरडा हनुमान मंदिरात गेला; दलित कुटुंबाला २३ हजारांचा दंड भरावा लागला

चिमुरडा हनुमान मंदिरात गेला; दलित कुटुंबाला २३ हजारांचा दंड भरावा लागला

Next

कोप्पल: चिमुरडा हनुमान मंदिरात गेल्यानं त्याच्या पालकांना २३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कर्नाटकातल्या हनुमासागरजवळ असलेल्या मियापुरा गावात हा प्रकार घडला. दोन वर्षांचा चिमुकला हनुमान मंदिराच्या गेला. मुलाचा वाढदिवस असल्यानं त्याचे वडील त्याला घेऊन मंदिरात गेले होते. मात्र या मंदिरात प्रवेश करण्यास दलितांना मज्जाव आहे. त्यामुळे चिमुकल्याच्या वडिलांना २३ हजारांचा दंड भरण्यास सांगण्यात आलं. 

मियापुरा गावातील हनुमान मंदिरात दलितांना प्रवेश नाही. दलित व्यक्ती मंदिराच्या बाहेरूनच हनुमानाला नमस्कार करतात. याची जाणीव असल्यानं वडील मुलाला घेऊन मंदिराच्या बाहेरचे उभे होते. तिथूनच ते हनुमानाची आराधना करते. मात्र उत्साहात असलेला त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मंदिराच्या आत धावत गेला. थोड्याच वेळात तो देवाला नमस्कार करून बाहेर आला. ४ सप्टेंबरला ही घटना घडली.

कोरोना मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार मिळणार; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती 

दलित मुलाच्या प्रवेशानं मंदिर अपवित्र झाल्याचा दावा
दलित मुलाच्या प्रवेशामुळे मंदिर अपवित्र झाल्याचा दावा उच्च जातीच्या व्यक्तींनी केला. त्यानंतर ११ सप्टेंबरला एक बैठक झाली आणि मुलाच्या आई-वडिलांना २३ हजारांचा दंड भरण्यास सांगितलं. या रकमेचा वापर मंदिराच्या शुद्धीकरणासाठी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, महसूल, समाज-कल्याण विभागाचे अधिकारी गावात पोहोचले. पुन्हा असा प्रकार घडल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी उच्च जातीच्या सदस्यांना दिला.

Read in English

Web Title: Dalit family fined Rs 23K after 2 year old son enters temple in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.