वणकर यांच्या बळीनंतर दलितांना मिळणार जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:05 AM2018-02-20T03:05:23+5:302018-02-20T03:05:26+5:30
गुजरात सरकारने दलितांना जमीन वाटप करण्यासह इतर मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यामुळे दलित कार्यकर्ते भानुभाई वणकर (६२) यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी सोमवारी ताब्यात घेतला
अहमदाबाद : गुजरात सरकारने दलितांना जमीन वाटप करण्यासह इतर मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यामुळे दलित कार्यकर्ते भानुभाई वणकर (६२) यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी सोमवारी ताब्यात घेतला. पाटण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर १५ फेब्रुवारी रोजी वणकर यांनी स्वत:ला पेटवून घेतले होते. दलित कुटुंबाला जमीन मिळण्याची त्यांची मागणी होती.
अहमदाबादेतील खासगी रुग्णालयात दुसºया दिवशी त्यांचा मृत्यू झाला. वणकर यांच्यावर उंझा (जिल्हा मेहसाणा) या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गांधीनगरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, दलित समाजाच्या लोकांना जमिनीचा ताबा सहा महिन्यांत दिला जाईल.
वणकर मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी)
स्थापन केले जाणार आहे. वणकर यांचा मृत्यू झाल्यापासून दलित नेते आणि दलित समाजाने राज्यात आंदोलन सुरू केले होते. (वृत्तसंस्था)
दलितांना जमीन मिळाली पाहिजे या मागणीसह वणकर कुटुंबियांच्या मागण्या मान्य केल्या जातील. मृत्युच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग स्थापन केला जाईल. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीतही सामावून घेतले जाईल, असे सरकारने म्हटले आहे.