‘दलितांवरील हल्ले सहन करणार नाही’

By admin | Published: July 22, 2016 05:48 AM2016-07-22T05:48:40+5:302016-07-22T05:48:40+5:30

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आमचे सरकार देशामध्ये दलितांवरील हल्ले अजिबात सहन करणार नाही, असे सांगून मोदी सरकारच्या काळात असे हल्ले वाढल्याच्या विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले.

'Dalits will not tolerate attacks' | ‘दलितांवरील हल्ले सहन करणार नाही’

‘दलितांवरील हल्ले सहन करणार नाही’

Next


नवी दिल्ली : गुजरातमध्ये दलितांना झालेल्या मारहाणीच्या प्रश्नावरून राज्यसभेत गुरुवारी वातावरण तापले असताना, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आमचे सरकार देशामध्ये दलितांवरील हल्ले अजिबात सहन करणार नाही, असे सांगून मोदी सरकारच्या काळात असे हल्ले वाढल्याच्या विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. गुजरातमधील प्रकरणात गुंतलेल्या आरोपींना सहा महिन्यांच्या आतच शिक्षा व्हावी, यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार आहे.
दलितांवरील शारीरिक वा शाब्दिक हल्ले आमचे सरकार सहन करणार नाही, असा इशारा देत ते म्हणाले की, ‘अशा संवेदनशील प्रश्नाबाबत राजकारण करून चालणार नाही. गुजरातमध्ये दलितांना जोरदार मारहाण केल्याप्रकरणी आतापर्यंत राज्य सरकारने १६ जणांना अटक केली आहे, तसेच चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे,’ असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.(लोकमत न्युज नेटवर्क)

Web Title: 'Dalits will not tolerate attacks'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.