इगतपुरीच्या पूर्व भागात नुकसान
By admin | Published: March 3, 2016 01:57 AM2016-03-03T01:57:10+5:302016-03-03T01:57:10+5:30
Next
>सर्वतीर्थ टाकेद ( वार्ताहर ) ईगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात सांयकाळी सहा वाजता तुफान वादळी वा-यासह गारांचा पाऊस पडुन सर्वत्र आहाकार उडाला.या पाऊस व गारापिटी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चार वाजे पासुनच विजांचा गडगडाट सुरू झाला होता.कुठेतरी ढग दिसत होते मात्र विजांचा कडकडाट सुरू झाला व आंबेवाडी खडकेद इंदोरे वासाळी खेड माळवाडी या भागाकडून प्रथम सोसाट्याचा वारा व पाऊस सुरू झाला अन् क्षणात सोनोशी बांबळेवाडी मायदरा टाकेद अधरवड अडसरे या भागात गारांचा वर्षाव होऊन सर्वत्र गारांचाच पाऊस सुरू झाला.शेतात अंगणात रस्त्यात गारांचे ढीग साचले होते.सर्वत्र पांढरेशुभ्र आच्छादन तयार झाले होते.खेड माळवाडी काननवाडी या भागात मलाचिन पेपर गारपीटीमुळे फाटून गेला.तर पिकांची अवस्था तर वर्णन करण्यापलीकडे आहे.शेतक-यांनी कर्ज काढुन एक एकरासाठी ड्रीप व मलाचिनपेपर साठी लाख रूपये खर्च केले आहेत.या भागात सुमारे चारशे हेक्टर क्षेत्राची नुकसान झाल्याचा अंदाज वर्तिवला जात आहे.टॉमँटो वांगी काकडी कांदा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या बाबत तहसिलदार महेंद्र पवार यांनी प्रत्येक्ष पहाणी करून शेतक-यांच्या व्यथा जाणल्या. या गारपीटी मुळे कांदा हा पुर्ण पसरून गेला व त्यावर गारांचा थर साचल्यामुळे या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक शेतक-यांनी कांदे काढण्यास सुरवात केली होती तर काही शेतकरी कांदे काढण्याच्या तयारीत होते या मुळे हातातोंडाशी आलेला घास या गारपीठीमुळे नष्ट झाल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे. अनेक शेतक-यांनी हरभरा काढण्यास सुरवात केली होती ज्यांनी काढला तो शेतातच राहीला तर ज्यांनी काढला नाही तो फुगुन जाईल तर अनेक शेतक-यांचे टॉम्याटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सोंगणीस आलेला गहू आडवा पडला तर ज्यांनी कापणी करून शेतात ठेवला होता त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अडसरे फळविहीर वाडी येथे सुदाम कातोरे यांच्या कलींगडाचे शेतात पुर्ण पाणी साचुन सर्व पिकच नष्ट झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना शासनाने विजिबल माफ कराव.बँकेची वसुली थांबवावी .शेतक-यांना दुबार पेरणी साठी त्वरीत मदत देण्याची मागणी शेकापचे नाशिक जिल्हा सरचिटणसि अशोक बोराडे .उपसभापती पांडुरंग पाटील वारूंगसे .हरीभाऊ वाजे बाळासाहेब घोरपडे रामचंद्र परदेशी यांनी मागणी केली आहे. वार्ताहर