मालमत्तांची हानी केल्यास तुरुंगवास, पाच वर्षे कारावास आणि मोठ्या दंडाची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 06:28 AM2017-10-28T06:28:30+5:302017-10-28T06:28:44+5:30
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक, खासगी मालमत्तेची हानी करणा-यांना दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक, खासगी मालमत्तेची हानी करणा-यांना दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी तशा वटहुकुमावर सही केली आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
काश्मीर खोºयात दगडफेक, जाळपोळ अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रक्षोभक कारण नसतानाही हे प्रकार होत आहेत. ते व्हावेत, यासाठी एसएमएस पाठविणे आणि व्हॉट्स अॅपवरून निरोप देणे वाढले आहे. त्यामुळे मोबाइल इंटरनेट सेवा अनेकदा बंद करावी लागत आहे. त्याच्या जोडीला आता तुरुंगवास व दंड अशा शिक्षाही होतील, या प्रकारांमुळे या घटना कमी होतील, असे सरकारला वाटत आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू नाही. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी वटहुकूम काढला आहे. (वृत्तसंस्था)
>आवाहन करणे हा गुन्हाच
सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची थेट हानी करणे शिक्षापात्र ठरविण्यात आले असून, अशा कृतीसाठी आवाहन करण्यालाही गुन्ह्याला प्रोत्साहन देणे समजले जाईल. अशा कृती व आवाहन यासाठी दोन ते पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल व हानी झालेल्या मालमत्तेची भरपाई दंडाच्या रूपाने वसूल केली जाईल.