गाव सरपंचानेच थाटला शाळेच्या वर्गात डान्सबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:01 AM2017-08-11T01:01:57+5:302017-08-11T01:02:00+5:30

Dancers in the school class with the Sarpanch of the village | गाव सरपंचानेच थाटला शाळेच्या वर्गात डान्सबार

गाव सरपंचानेच थाटला शाळेच्या वर्गात डान्सबार

Next

मिर्झापूर (उत्तर प्रदेश) : ‘नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा...शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे' अशी विद्यामंदिराची महती असली तरी शाळेच्या एका वर्गाला ‘डान्सबार’चे रूप देऊन अश्लील गाण्यांवर मादक हावभाव करीत नृत्यबाला छमा...छम नाचल्या. सरपंचाच्या मर्जीतील २० ते २५ लोकांनी मद्याचे प्याले रिचवत अन् नृत्यबालांवर पैशांची मनसोक्त उधळण करून सरपंचाच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला.
तेतरियाच्या प्राथमिक शाळेतील या बीभत्सपणाचा व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर झळकल्यानंतर शिक्षण खात्याने चौकशीचे आदेश दिले आहेत. शाळेला ७ आॅगस्टला रक्षाबंधनाची सुटी होती. मुलाचा वाढदिवस आणि त्याच दिवशी शाळेला सुटी. त्यामुळे सरपंचाने रात्री या एका वर्गात रंगतदार मेजवानी आयोजित केली. डान्सबारही फिका पडावा, असा तो मदमस्त सोहळा होता, असे या व्हिडिओतून स्पष्ट जाणवते.
प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीणकुमार तिवारी यांनी व्हिडिओच्या आधारे चौकशीचे आदेश दिले आहेत. तिवारी म्हणाले की, सरपंचाने ५ आॅगस्ट रोजीच मुख्याध्यापकांकडून शाळेच्या चाव्या घेतल्या. शाळेची बरीच कामे सरपंच करीत असल्याने मुख्याध्यापकांनी सरपंचाकडे चाव्या सोपविल्या होत्या.
सरपंचाने मात्र वर्गातनृत्य-संगीतासह ओल्या पार्टीचे आयोजन केले. त्या रात्री नृत्यबालांच्या अदांवर फिदा होत सरपंचाच्या चाहत्यांनी मद्याचे प्याले रिचवत पैशांची उधळण केली. त्यानंतर ही मंडळी साफसफाई न करता ही मंडळी तोल सावरत निघून गेली. (वृत्तसंस्था)

वर्ग केला स्वच्छ

मंगळवारी शाळा उघडल्यानंतर वर्गात सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि खरकटे अन्न विखुरलेले दिसले. विद्यार्थी आणि शिक्षकांना हा वर्ग स्वच्छ करावा लागला, अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेच्या परिसरात आयोजित करण्याची मुभा नाही. त्या कार्यक्रमास परवानगी मागण्यात आलेली नव्हती, असे शिक्षणाधिकारी तिवारी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Dancers in the school class with the Sarpanch of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.