रुग्णवाहिकेतच सुरू होतं अश्लील काम, व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 04:49 PM2020-07-21T16:49:28+5:302020-07-21T17:01:51+5:30

रामपूर जिल्ह्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयात वापरात येणारी रुग्णावाहिकी जीबीके कंपनीद्वारे अधिग्रहित केली जाते

Dancing ambulance ... The program started in an ambulance, the catastrophic video went viral in delhi | रुग्णवाहिकेतच सुरू होतं अश्लील काम, व्हिडिओ झाला व्हायरल

रुग्णवाहिकेतच सुरू होतं अश्लील काम, व्हिडिओ झाला व्हायरल

Next
ठळक मुद्दे.  रामपूर जिल्ह्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयात वापरात येणारी रुग्णावाहिकी जीबीके कंपनीद्वारे अधिग्रहित केली जाते.रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करायची, हेही कंपनीनेच ठरवायचे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले.

लखनौ - सरकारी रुग्णावाहिकेतील 17 सेकंदाचा आपत्तीजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील ही घटना असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने कारवाई करत रुग्णवाहिकेच्या चालकास कामावरुन तत्काळ कमी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णावाहिका आणि वैद्यकीय क्षेत्राचं काम मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यातच, अशा घटनांमुळे या कामाला गालबोट लागत आहे.

रामपूर जिल्ह्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयात वापरात येणारी रुग्णावाहिकी जीव्हीके कंपनीद्वारे अधिग्रहित केली जाते. या रुग्णवाहिकेतील कंपनीच्या एका कर्चमाऱ्याचा आपत्तीजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या शासकीय रुग्णवाहिकेत कर्मचारी एका महिलेसोबत दिसून येत आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओनंतर प्रशासनाने तत्काळ याची दखल घेतली. त्यानुसार, जीव्हीके कंपनीला घटनेची माहिती दिली. त्यानंतर, कंपनीने संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करत, त्यास कामावरुन कमी केले आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करायची, हेही कंपनीनेच ठरवायचे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले. याप्रकरणी मुख्य वैद्यकीय अधिकारी सुबोध कुमार शर्मा म्हणाले की, एका रुग्णावाहिकेत काही लज्जास्पद काम करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यासाठी जीबीके कंपनीला लेखी तक्रार केली होती. त्यानंतर, कंपनीने संबंधित कर्मचाऱ्याला कामावरुन कमी केल्याचं मला स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे शर्मा यांनी सांगितले. 
 

Web Title: Dancing ambulance ... The program started in an ambulance, the catastrophic video went viral in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.