याचिका दाखल करावी म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यासमोर केला नाच
By admin | Published: February 23, 2016 09:47 PM2016-02-23T21:47:12+5:302016-02-23T21:47:12+5:30
आपली याचिका दाखल करावी म्हणून एका इसमाने अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यासमोर नाच केल्याची हास्यस्पद घटना घडली आहे
ऑनलाइन लोकमत
मनसूर, दि. २३ - आपली याचिका दाखल करावी म्हणून एका इसमाने अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यासमोर नाच केल्याची हास्यस्पद घटना घडली आहे. उत्तरप्रदेश मधील मनसूर येथे राहणाऱ्या इसमाने आपली याचिका दाखल करण्यात यावी म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यासमोर नाच केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
त्या व्यक्तीची याचिका सतत खारिज (रद्द) केली जात होती, कंटाळलेल्या त्या व्यक्तिने सर्वासमोंर नाचत आपली याचिका मंजूर करण्यात यावी अशी विनंती केली असल्याचं दिसते आहे.
दरम्यान, त्याने दाखल केलेली याचिका कोणती होती ? आणि ती सतत खारिज का करण्यात येत होती ? याची माहीती अद्याप कोणालाही नाही.
त्या व्यक्तिची याचिका शेवटी रद्द करण्यात आली आणि त्याला सभागृहातून बाहेर हाकलण्यात आले.
WATCH: Man dances in front of Collector in Mandsaur(MP) claiming he has been repeatedly denied to put forth his pleahttps://t.co/xgQYmsjo1A
— ANI (@ANI_news) February 23, 2016