दांडेकर नगरवासियांच्या आंदोलना हिंसक वळण पर्यायी जागेची मागणी : मनपावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2016 06:25 PM2016-06-05T18:25:59+5:302016-06-05T18:25:59+5:30
जळगाव : दांडेकर नगर झोपडपी वासियांना पर्यायी जागा द्यावी यासाठी शनिवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनपावर दगडफेक करण्यात आली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आमदार व महापौर यांनी गरिबांच्या प्रश्नावर भांडावे असे आवाहन केले.
Next
ज गाव : दांडेकर नगर झोपडपी वासियांना पर्यायी जागा द्यावी यासाठी शनिवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनपावर दगडफेक करण्यात आली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आमदार व महापौर यांनी गरिबांच्या प्रश्नावर भांडावे असे आवाहन केले.दांडेकरनगर झोपडपी वासियांना पर्यायी जागा द्यावी या मागणीसाठी शनिवारी दुपारी १२ वाजता दांडेकर नगरातून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरी महापालिकेत दाखल झाले. यावेळी मोर्चेकरी आपल्या मागणीसाठी आक्रमक झाले. यावेळी झालेल्या दगडफेकीत मनपाची काच फुटली. यावेळी जगन सोनवणे यांनी मोर्चेकर्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. दगडफेकीने जागेचा प्रश्न सुटणार नसून मनपा प्रशासन व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी दाखल झाले.गरिबांसाठी भांडण करापीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. आमदार व महापौर यांनी गरिबांच्या प्रश्नावर भांडावे असे आवाहन त्यांनी केले. झोपडपीधारकांना पर्यायी जागा द्यावी या मागणीसाठी आपण विधान परिषदेत अधिवेशनात आवाज उठवू असे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी जळगावात मथुरा होऊ नये असा इशारा दिला. ५०० गरिबांच्या संसाराचा प्रश्न असल्याने प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.गाढव मोर्चाचे नेतृत्व प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी केले. यावेळी प्रकाश मोरे, संतोष मेश्राम, आरिफ शेख, आशा बडगे, राजू रुपवने, गौतम निकम, संगीता ब्रााणे, महेंद्र सपकाळे, गजानन कांबळे, राजू सपकाळे, अनिल सुरवाडे यांच्यासह नागरिक सहभागी झाले.