धोक्याची घंटा.. .भारतात कर्करोगामुळे दररोज १,३०० जणांचा मृत्यू

By admin | Published: May 17, 2015 12:45 PM2015-05-17T12:45:54+5:302015-05-17T12:56:25+5:30

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे वाढते प्रमाण, आरोग्याला अपायकारक आहार अशा विविध कारणांमुळे देशात कर्करोगामुळे मृत्यू होणा-यांची संख्या दिवसेगणिक वाढत आहे.

Danger bell .. In India, the death of 1,300 people every day due to cancer | धोक्याची घंटा.. .भारतात कर्करोगामुळे दररोज १,३०० जणांचा मृत्यू

धोक्याची घंटा.. .भारतात कर्करोगामुळे दररोज १,३०० जणांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १७ - तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे वाढते प्रमाण, आरोग्याला अपायकारक आहार अशा विविध कारणांमुळे देशात कर्करोगामुळे मृत्यू होणा-यांची संख्या दिवसेगणिक वाढत आहे. २०१४ मध्ये कर्करोगामुळे दररोज सुमारे १,३०० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती भारतीय वैद्यक संशोधक परिषदेच्या (आयसीएमआर) अहवालातून समोर आली आहे. भारतात सर्वाधिक मृत्यू कर्करोगामुळेच होतात असा दावाही केला जात आहे. 

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१४ या कालावधीत कर्करोगामुळे होणा-या मृत्यूच्या प्रमाणात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये देशभरातील कर्करुग्णाच्या २८ लाख २० हजार १७९ रुग्णांपैकी ४ लाख ९१ हजार ५९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०१३ मध्ये २९ लाख २४ हजार ३१४ रुग्णांपैकी ४ लाख ७८ १८० रुग्णांचा तर २०१२ मध्ये ३० लाख १६ हजार ६२८ रुग्णांपैकी ४ लाख ६५ हजार १६९ जणांचा मृत्यू झाला होता. वृद्धांची वाढती संख्या, आरोग्यास घातक ठरणारी जीवनशैली, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे वाढते प्रमाण अशा विविध कारणांमुळे कर्करोगामुळे मृत्यू होणा-या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. कर्करोगापाठोपाठ क्षयरोगामुळे मृत्यू होणा-यांचे रुग्ण दुस-या क्रमांकावर आहेत. क्षयरोगामुळे २०१३ मध्ये तब्बल ५७ हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता असे एका अधिका-याने सांगितले. 

Web Title: Danger bell .. In India, the death of 1,300 people every day due to cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.