भारतासाठी धोक्याची घंटा! पाकिस्तानची अणवस्त्रे पडू शकतात दहशतवाद्यांच्या हातात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 09:04 AM2017-09-25T09:04:56+5:302017-09-25T13:55:04+5:30

पाकिस्तानचा अणवस्त्रसाठा पूर्णपणे सुरक्षित आहे. पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाबद्दल कोणीही चिंता करण्याचे कारण नाही.

Danger bell for India Pakistan's nuclear weapons can fall into the hands of terrorists | भारतासाठी धोक्याची घंटा! पाकिस्तानची अणवस्त्रे पडू शकतात दहशतवाद्यांच्या हातात

भारतासाठी धोक्याची घंटा! पाकिस्तानची अणवस्त्रे पडू शकतात दहशतवाद्यांच्या हातात

googlenewsNext
ठळक मुद्दे2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला झाल्यानंतर भारताने कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीनची रणनिती तयार केली.पांरपारिक युद्धात या छोटया अणवस्त्राचा वापर झाला तर, अणवस्त्र युद्धाचा भडका उडेल

वॉशिंग्टन - पाकिस्तानचा अणवस्त्रसाठा पूर्णपणे सुरक्षित आहे. पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाबद्दल कोणीही चिंता करण्याचे कारण नाही असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी मागच्या आठवडयात अमेरिकेमध्ये सांगितले होते. पण आता अमेरिकेतूनच पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान बनवलेली अणवस्त्रे पूर्णपणे असुरक्षित असून, ती दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचा धोका आहे असे फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

पाकिस्तानने नऊ जागांवर ही अणवस्त्रे जमवून ठेवली आहेत असे या अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानने वेगवेगळया बेसवर अणवस्त्र जमवली असून हे बेस अणवस्त्रे डागण्यास सक्षम आहेत असे अमेरिकन अणवस्त्र तज्ञ आणि अहवालाचे सहलेखक हॅन्स क्रिस्टन्सन यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. पाकिस्तान छोटया पल्ल्याच्या अणवस्त्रांसाठी भांडारगृह बनवत आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

पांरपारिक युद्धात या छोटया अणवस्त्राचा वापर झाला तर, अणवस्त्र युद्धाचा भडका उडेल अशी भिती क्रिस्टन्सन यांनी व्यक्त केली. भारतीय लष्कराच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन' रणनितीचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने छोटया पल्ल्याची अणवस्त्रे विकसित केली आहेत असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी अमेरिकेमध्ये बोलताना सांगितले होते. जबाबदार यंत्रणेकडे पाकिस्तानच्या अणवस्त्र साठयाचे नियंत्रण असून, त्याचा गैरवापर होणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. 

पाकिस्तानच्या न्यूक्लियर कमांड ऑथोरीटीकडे पाकिस्तानच्या अणवस्त्र साठयाचे नियंत्रण असून, प्रसंगी वापर करण्याचे अधिकारही एनसीएकडे असल्याचे अब्बासी यांनी सांगितले. भारताच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन' रणनितीचा सामना करण्यासाठी आम्ही छोटया पल्ल्याची अणवस्त्रे विकसित केली आहेत असे त्यांनी सांगितले. 

पाकिस्तानचा अणवस्त्र साठा वेगाने वाढत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, जगातील अन्य देशांइतकाच पाकिस्तानचा अणवस्त्र साठा सुरक्षित आहे. पाकिस्तानची अणवस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडणार नाहीत ती पूर्णपणे सुरक्षित आहेत असे त्यांनी सांगितले. पाकिस्तान एक जबाबदार देश असून मागच्या 15 वर्षांपासून आम्ही दहशतवादाची लढाई लढत आहोत असे अब्बासी यांनी सांगितले. 

'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन' म्हणजे काय 
2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला झाल्यानंतर भारताने कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीनची रणनिती तयार केली. संसदेवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानला तात्काळ उत्तर देता आले नव्हते. सीमेवर सैन्याची जमवाजमव आणि युद्धाच्या तयारीला भारताला वेळ लागला होता. त्याचवेळी पाकिस्तानने दोनहात करण्याची पूर्ण तयारी करुन ठेवली होती. त्यावेळी 'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन'ची रणनिती तयार केली. 2001 साली जी चूक झाली त्यातून घेतलेला हा धडा आहे. या रणनितीनुसार उद्या लढाईचा प्रसंग उदभवल्यास पाकिस्तानला तयारीसाठी अजिबात वेळ न देता तिन्ही सैन्य दले एकत्र येऊन हल्ला करतील. 
 

Web Title: Danger bell for India Pakistan's nuclear weapons can fall into the hands of terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.