नाल्यांमधील अतिक्रमण ठरणार डोकेदुखी पुराचा धोका : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडेही मनपा प्रशासनाचा कानाडोळा

By admin | Published: April 24, 2016 09:03 PM2016-04-24T21:03:21+5:302016-04-24T21:03:21+5:30

जळगाव : दोन वर्षांपूर्वी जोरदार पावसामुळे शहरातील नाल्यांना आलेल्या महापुरात नाल्याकाठच्या अनेक वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. जिल्हाधिकार्‍यांनी या पुराची पाहणी करतानाच नाल्यातील अतिक्रमणामुळे ही पूरस्थिती उद्भवल्याचे लक्षात आल्याने तातडीने कार्यवाहीचे आदेश आयुक्तांना दिले होते. मात्र मनपा प्रशासनाने त्याकडे सोयीस्करपणे दूर्लक्ष केलेले दिसून येत आहे.

The danger of headache due to encroachment in the Nallah: The Municipal Administration's anguish | नाल्यांमधील अतिक्रमण ठरणार डोकेदुखी पुराचा धोका : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडेही मनपा प्रशासनाचा कानाडोळा

नाल्यांमधील अतिक्रमण ठरणार डोकेदुखी पुराचा धोका : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडेही मनपा प्रशासनाचा कानाडोळा

Next
गाव : दोन वर्षांपूर्वी जोरदार पावसामुळे शहरातील नाल्यांना आलेल्या महापुरात नाल्याकाठच्या अनेक वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. जिल्हाधिकार्‍यांनी या पुराची पाहणी करतानाच नाल्यातील अतिक्रमणामुळे ही पूरस्थिती उद्भवल्याचे लक्षात आल्याने तातडीने कार्यवाहीचे आदेश आयुक्तांना दिले होते. मात्र मनपा प्रशासनाने त्याकडे सोयीस्करपणे दूर्लक्ष केलेले दिसून येत आहे.
प्रमुख नाल्यांपासून पुराचा धोका
शहरातील ५ मोठ्या नाल्यांपैकी लेंडी नाला, समतानगर ते दीपक फूडपर्यंतचा नाला व मेहरूण एमडीएस कॉलनी ते इकबाल कॉलनीपर्यंतच्या नाल्यावरील अतिक्रमणांमुळे या नाल्याच्या परिसरात पुराचा धोका वाढला आहे. या वर्षी पाऊस जोरदार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे नाल्याचे पात्र मोकळे नसल्याने पुराचे पाणी आजूबाजूच्या वसाहतींमध्ये शिरून नुकसान होण्याची भिती आहे.
३१ मे पूर्वी कार्यवाही आवश्यक
शासन आदेशानुसार सर्व मनपांनी १५ मार्च पासूनच नालेसफाईचे नियोजन करणे अपेक्षित असून नालेसफाईचे हे काम ३१ मे पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र मनपाकडून त्याबाबत साफ दूर्लक्ष झालेले दिसून येत आहे.
एप्रिल महिला संपत आला तरीही मनपाकडून याबाबत प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात लालेली नाही. खर्चास परवानगी मिळूनही प्रभाग अधिकार्‍यांकडून कार्यवाही केली जात नाही. मात्र त्याचबरोबर आरोग्य विभागही ढीम्म दिसून येत आहे.
-------
प्रभाग समित्यांचे नेहमीच दूर्लक्ष
नालेसफाईबाबत नियोजन करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असली तरीही चारही प्रभाग समित्यांनी त्यांच्या क्षेत्रातील नाल्यांची सफाई करवून घेणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही प्रभाग समित्यांकडून या विषयाकडे सोयीस्करपणे दूर्लक्ष झालेले दिसून येते. तसेच आरोग्य विभागानेही स्वत: मोहीम आधी सुरू करणे अपेक्षित होते. मात्र आरोग्य विभागाचेही त्याकडे दूर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
------
५ मोठे नाले
जळगाव शहरात ५ मोठे नाले आहेत. या नाल्यांची एकूण लांबी २३.१ किमी आहे.
लेंडी नाला-शिवाजी उद्यान स्मशानभूमी ते ममुराबाद रोड ते शिवाजीनगर स्मशानभूमीपर्यंत. (लांबी ८.७ किमी)
समता नगर ते पिंप्राळा ते दीपक फूडपर्यंत. (लांबी ६.५ किमी)
मानराज मोटर्स ते म्हाडा ते खेडीपर्यंत. (लांबी ३.७५ किमी.)
मेहरूण एमडीएस कॉलनी ते इकबाल कॉलनीपर्यंत. (लांबी १.५ किमी)
रामदास कॉलनी ते सुरत रेल्वे गेटच्या पुलापर्यंत. (लांबी २.६५ किमी)
या व्यतिरिक्त शहरात चारही प्रभागात एकूण ६८ उपनाले आहेत.
प्रभाग १ मध्ये २९, प्रभाग २ मध्ये ८, प्रभाग ३ मध्ये १९ तर प्रभाग ४ मध्ये १२ उपनाले आहेत.

Web Title: The danger of headache due to encroachment in the Nallah: The Municipal Administration's anguish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.