दुसऱ्या लाटेचा धोका कायम, सावध राहिल्यास तिसरी लाट नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 05:54 AM2021-07-03T05:54:09+5:302021-07-03T05:54:26+5:30
संक्रमण दर १० टक्क्यांहून अधिक; १०० जिल्ह्यांत दररोज १०० रुग्ण
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : कोरोनाचा फैलाव वेगाने कमी होत असला तरी सरकारचे म्हणणे असे की, १६ राज्यातील ७१ जिल्ह्यात कोविड-१९ चा धोका कायम आहे. या जिल्ह्यात संक्रमणाचा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या आठवड्यापर्यंत चिंताजनक स्थितीच्या महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आता धोकादायक स्थितीच्या जिल्ह्याच्या यादीत नाहीत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले की, आंध्र प्रदेशमध्ये ९, अरुणाचल प्रदेश मध्ये १३, मणिपूरमध्ये ७, मेघालयात ८, राजस्थानमध्ये १० जिल्ह्यांत संक्रमणाचा दर चिंतेचा आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. पॉल म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट अजून पूर्ण संपलेली नाही.
१०० जिल्ह्यात आजही रोज १०० रुग्णांची नोंद होत आहे. केंद्र सरकारची तुकडी अनेक राज्यात पाठवली गेली आहे. या राज्यात छत्तीसगड, केरळ, ओदिशा, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये संक्रमण वाढल्याची माहिती मिळाली आहे. संक्रमण कोणतेही राज्य आणि जिल्ह्यातून पूर्ण देशात होऊ शकते. म्हणून संक्रमण पूर्ण देशातून संपेपर्यंत आम्ही सुरक्षित नाही, असे पॉल म्हणाले.
देशात २४ तासांत ४६,६१७ नवे रुग्ण
नवी दिल्ली : भारतात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात कोरोनाचे ४६,६१७ नवे रुग्ण आढळले तर ८५३ जणांचा मृत्यू झाला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनाद्वारे सांगितले. नव्या रुग्ण संख्येनंतर देशात एकूण रुग्णांची संख्या ३,०४,५८,२५१ झाली आहे व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१ टक्के झाले आहे.
कोरोना विषाणूने देशात आतापर्यंत चार लाख ३१२ जणांचा बळी घेतला आहे तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ५ लाख ९ हजार ६३७ वर आली आहे. एकूण रुग्ण संख्येत हे प्रमाण १.६७ टक्के आहे. २४ तासात १३,६२० रुग्ण घटले आहेत.
सलग २५ व्या दिवशी रुग्ण सकारात्मक निघण्याची टक्केवारी पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे तर नव्या रुग्ण संख्येच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण सलग ५० व्या दिवशी जास्त आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
सावध राहिल्यास तिसरी लाट नाही
तिसरी लाट येणे न येणे हे आमच्या हाती आहे. जर आम्ही शिस्त पाळली, दृढनिश्चय केला तर ती लाट येणार नाही. डेल्टा प्लसच्या संक्रमणाबद्दलही पॉल म्हणाले की, त्याचे रुग्ण १२ राज्यात मर्यादित असून रुग्ण संख्या वाढून ५६ झाली आहे, असे डॉ. पॉल म्हणाले.
डेल्टा विषाणूमुळे युरोपमध्ये तिसऱ्या लाटेचा इशारा
nसंयुक्त राष्ट्र : जगात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा कहर वाढू लागला आहे. हा विषाणू वेगाने पसरू लागला असून जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू ९६ देशांत पसरल्याचे सांगितले आहे. येत्या महिन्यांत कोरोनाचे हे नवे रूप जगासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हा विषाणू पहिल्यांदा भारतात सापडला होता. मंगळवारपर्यंत हा डेल्टा व्हेरिअंट ९६ देशांमध्ये सापडला आहे.
nहूने ही आकडेवारी जाहीर केली. हा आकडा आणखी वाढू शकतो, कारण विषाणूच्या या रुपाची ओळख पटविण्यासाठी जीनोम सीक्वेंसिंग क्षमता या मर्यादित आहेत. अनेक देशांनी डेल्टा व्हेरिअंटमुळे संक्रमण वाढत आहे.