घुसखोरी रोखण्यात भटक्या कुत्र्यांचा वाटा मोठा
By admin | Published: October 11, 2015 10:56 PM2015-10-11T22:56:52+5:302015-10-11T22:56:52+5:30
ती ‘स्नायफर डॉग’ म्हणवणारी खास जातीची कुत्री नाहीत. ती आहेत रस्त्यांवर कुणीही हाकलून द्यावी अशी बेवारस भटकी कुत्री. त्यांना खास प्रशिक्षण दिले गेले नाही किंवा
मेंधार : ती ‘स्नायफर डॉग’ म्हणवणारी खास जातीची कुत्री नाहीत. ती आहेत रस्त्यांवर कुणीही हाकलून द्यावी अशी बेवारस भटकी कुत्री. त्यांना खास प्रशिक्षण दिले गेले नाही किंवा त्यांच्या दिमतीला खास सेवकही नाहीत. नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याला कायम डोकेदुखी ठरणारी घुसखोरी रोखण्यात मात्र जवानांना याच बेवारस भटक्या कुत्र्यांचा मोठा आधार वाटतो.
जम्मू-काश्मिरात स्फोटके हुडकून काढणे, त्यांचा मागोवा घेणे किंवा गस्तीची जबाबदारी अशा खास प्रशिक्षित कुत्र्यांवर नाही. सध्या नियंत्रण रेषेवरील कमांडर्सना अशा भटक्या कुत्र्यांना आसरा देण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. पाकिस्तानी घुसखोरांची कुणकुण लागताच भुंकत पहिली वर्दी देण्याचे काम तेच करतात, असे लेप्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांनी सांगितले. पीर पंजाल पट्ट्याच्या दक्षिणेकडील २२४ कि.मी. नियंत्रण रेषेचे (एलओसी) संरक्षणाची जबाबदारी नाग्रोता येथील १६ व्या कॉर्प्सकडे आहे. निंभोरकर हे या कॉर्प्सचे कमांडर आहेत. (वृत्तसंस्था)
रात्रीला ते संत्रींना सदैव सतर्क ठेवतात, असे मेजर प्रणव अवस्थी यांनी सांगितले. त्यांच्या चौकीवर अलीकडेच एक पिलाचा जन्म झाला असून त्याला सैफ अली खान याच्या ‘फॅन्टम’ या चित्रपटाचे नाव देण्यात आले आहे. जवानांची सोबत करताना या कुत्र्यांना बिबट्यांच्या हल्ल्यांचा मुकाबला करावा लागतो. बिबट्यांनी अनेक कुत्र्यांचा घास घेतला आहे. कारण दबा धरून बिबटे हल्ले करतात, असे एका जवानाने सांगितले.