धक्कादायक, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अतिवापरामुळे येऊ शकतं वृद्धत्व !
By admin | Published: June 27, 2016 07:07 AM2016-06-27T07:07:36+5:302016-06-27T07:10:23+5:30
गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं माणसाच्या आयुष्यातील महत्त्व गरजेपेक्षा जास्त वाढलं आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं माणसाच्या आयुष्यातील महत्त्व गरजेपेक्षा जास्त वाढलं आहे. अनेकदा मोबाईल, लॅपटॉपच्या आहारी गेलेला माणूस भूक-तहानही विसरतो, अशा घटनाही समोर आल्या आहेत. मात्र या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अतिप्रमाणात वापर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मोबाईल फोन आणि टॅबलेटसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असून, वृद्धत्व लवकर येण्याची चिन्हे असतात, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या अतिवापरामुळे त्वचा सैल पडणे, जबडा मोठा होणे, चेह-यावर सुरकुत्या पडणे, मानेवर चरबी वाढणे, चेह-याच्या सौंदर्यावर विपरीत परिमाण होण्याची शक्यता आहे. कॉम्प्युटर, टॅबलेट, स्मार्टफोन सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या समोर तासनतास बसून राहिल्यास डोकं दुखणं, चेह-यावर सुरकुत्या पडणे आणि खांद्यांचं दुखणंही उद्भवत असल्याची माहिती फोर्टिस हॉस्पिटलचे कॉस्मेटिक सर्जन विनोद विज यांनी दिली आहे.
इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) या संस्थेनं काही दिवसांपूर्वीच केलेल्या सर्वेक्षणातून देशातले 371 लाख लोक मोबाईल आणि इंटरनेटचा अधिक प्रमाणात वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यातले 40 टक्के वापरकर्ते हे 19-30 वयातील तरुण आहेत. इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये नकारात्मकता वाढत असून, त्याचा त्वचा आणि मानेच्या हाडांवर विपरीत परिणाम होत असल्याचं सीनियर कॉस्मेटिक सर्जन मोहन थॉमस यांनी म्हटलं आहे.