Anand Mahindra: दंगर्ल गर्लने खरेदी केली न्यू लाँच्ड 'स्कॉर्पिओ एन', महिंद्रा म्हणाले हा तर बोनस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 05:27 PM2022-09-28T17:27:32+5:302022-09-28T17:38:13+5:30
आनंद महिंद्रा यांनी अनेकदा सोशल मीडिया अकाऊंटवर जाहीर करुन अनेक खेळाडूंना महिंद्राच्या कार गिफ्ट दिल्या आहेत.
मुंबई - कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकणारी आणि दंगल गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली कुस्तीपटू गीता फोगाटने महिंद्राची लेटेस्ट कार खरेदी केली आहे. महिंद्रा ग्रुपने नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आणि दसऱ्याच्या अगोदर महिंद्रा एसयूवी ची बिग डैडी' महिंद्रा स्कॉर्पियो-एन लाँच केली आहे. या गाडीची डिलिव्हरी देण्यासही सुरुवात झाली आहे. ऑलिंपिक पदक विजेती गीता फोगाटने ही कार खेरदी केली आहे. आनंद महिंद्रा यांना याबाबत माहिती होताच नेहमीप्रमाणे त्यांनी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिली.
आनंद महिंद्रा यांनी अनेकदा सोशल मीडिया अकाऊंटवर जाहीर करुन अनेक खेळाडूंना महिंद्राच्या कार गिफ्ट दिल्या आहेत. तर, कोणी हटके मॉडेलची जुगाडू गाडी बनवल्याने, त्यांनाही नवी शोरुम कार दिल्याचं आपण सोशल मीडियावर पाहिलं आहे. आता, अथलेट गीता फोगाटने महिंद्र स्कॉर्पिओची कार खरेदी केली असून या नव्या गाडीचे घरी दिमाखात स्वागतही केले. त्यानंतर, आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली.
गीताने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गाडी खरेदी केल्याचे फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच, अशी अविश्वसनीय कार बनविण्यासाठी महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचे धन्यवाद केले आहेत. आजचा दिवस अतिशय सुंदर असून नवरात्रीच्या अगोदरच आमच्या घरी महिंद्रा स्कॉर्पिओ कार आली आहे. महिंद्रा ग्रुपचे या कार लाँचिंगसाठी धन्यवाद, असेही गीताने म्हटले.
This is a bonus. What a privilege to have you, Geeta, as one of our first customers for the Scorpio-N. We’re basking in your Gold Medal Glory! And we hope our car proves to be as tough as you! @geeta_phogathttps://t.co/4njzQuaTD2
— anand mahindra (@anandmahindra) September 26, 2022
गीताच्या ट्विटरवर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन रिप्लाय दिला आहे. हा आमच्यासाठी बोनस आहे, गीता फोगाटसारख्या प्रतिभाशाली व्यक्तीने स्कॉर्पिओ एन कारची निवड करणे आमच्यासाठी सौभाग्याची बाब आहे. तुमच्या गोल्ड मेडलचा लाभ आम्ही घेत आहोत, आम्हाला विश्वास आहे की आपल्या अपेक्षांची पूर्तता ही कार करेन, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.