Chhattisgarh Assembly Election : दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 08:39 AM2018-11-12T08:39:30+5:302018-11-12T09:09:08+5:30
छत्तीसगडमध्ये विधासभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे.
रायपूर - छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (12 नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली आहे. राजनांदगावच्या 5 तर बस्तरच्या 3 जागांसाठी आज मतदान होत आहे. दंतेवाडा येथील कटेकल्याण ब्लॉकमधील तुमाकपल कॅम्प येथे नक्षलवाद्यांनी आयईडी (इम्प्रोव्हाईजड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोट घडवून आणला. तसेच नक्षलवाद्यांनी दोन किलो वजनाचा आयईडी येथे पेरला होता. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. तुमाकपल-नयनार रस्त्यावर हा स्फोट झाला. सुरक्षा दल आणि मतदान अधिकारी सुरक्षित आहेत.
दंतेवाडा येथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. रविवारी (11 नोव्हेंबर) कांकेर येथे नक्षलवाद्यांनी बीएसएफला लक्ष्य करून सहा बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत. या स्फोटांमध्ये एका जवानाला वीरमरण आले. तसेच बीजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले आहे, तर एकाला अटक करण्यात आली. विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्याचे छडयंत्र नक्षलवाद्यांनी आखले असून, गेल्या दहा दिवसांमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलग्रस्त बस्तर भागातून 300 हून अधिक आयईडी जप्त केले आहेत.
Dantewada: 1-2 kilograms of Improvised Explosive Device (IED) blasted by naxals near Tumakpal camp in Katekalyan block. Voting is underway for 10 out of 18 seats in the first phase of #ChhattisgarhAssemblyElection2018.
— ANI (@ANI) November 12, 2018
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात रविवारी सकाळी नक्षलवाद्यांनी बीएसएफच्या गस्तीपथकावर पथकावर आयईडीद्वारे हल्ला केला. यादरम्यान, नक्षलवाद्यांनी सहा स्फोट घडवून आणले. या हल्ल्यात एएसआय महेंद्र सिंह जखमी झाले आहेत. बीएसएफचे गस्तीपथक रविवारी सकाळी कोयलीबेडा परिसरात गस्तीसाठी निघाले होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. दरम्यान, या जखमी जवानाला वीरमरण आले. दुसरीकडे बीजापूर जिल्ह्यात माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका माओवाद्याला कंठस्नान घातले आहे. तर एकाला जिवंत पकडले आहे. या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे.
IED was triggered by Naxals on Tumakpal-Nayanar road at around 5:30 am to target security forces. No harm to security forces & polling party. Party safely reached to Nayanar polling booth No. 183 under PS Katekalyan: Devnath, AIG (Anti-Naxal Ops). #Chhattisgarhhttps://t.co/mYZVvdTPee
— ANI (@ANI) November 12, 2018