डेअरडेव्हिल्सची लढत केकेआरविरुद्ध

By admin | Published: May 7, 2014 03:12 AM2014-05-07T03:12:23+5:302014-05-07T03:12:23+5:30

बॅकफूटवर आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला बुधवारी होणार्‍या आयपीएल - ७ मधील सामन्यात दोन्ही संघांपुढे घसरलेली गाडी रुळावर आणण्याचे आव्हान असेल.

Daredevils' fight against KKR | डेअरडेव्हिल्सची लढत केकेआरविरुद्ध

डेअरडेव्हिल्सची लढत केकेआरविरुद्ध

Next

नवी दिल्ली : घरच्या मैदानावर सुरुवातीचे दोन्ही सामने गमावणार्‍या दिल्ली डेअरडेव्हिल्सला तसेच सलग चार सामने गमविल्यानंतर बॅकफूटवर आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला बुधवारी होणार्‍या आयपीएल - ७ मधील सामन्यात दोन्ही संघांपुढे घसरलेली गाडी रुळावर आणण्याचे आव्हान असेल. यूएईत दोन सामने जिंकल्यानंतर फिरोजशाह कोटलावर दोन्ही सामने गमावणारा दिल्ली संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला. सातपैकी पाच सामने गमावणार्‍या या संघाला पुढचा रस्ता विजयाने सर करावा लागेल. केकेआरची स्थिती काही वेगळी नाही. सलग पाच सामने गमावल्याने त्याच्या नावापुढेही सातपैकी दोन विजयांची नोंद आहे. आता एकदेखील पराभव केकेआरला महागात पडू शकतो. मधल्या फळीतील फलंदाजी दोन्ही संघाचा कमकुवतपणा ठरला आहे. डेअरडेव्हिल्सचा मारा कमकुवत आहे, तर केकेआरकडून सुनील नरेन आणि शाकीब अल् हसन हेच प्रभावी ठरले आहेत. केकेआरसाठी चांगली बातमी ही, की तीन सामन्यात शून्यावर बाद झालेला कर्णधार गौतम गंभीर याने राजस्थानविरुद्ध ५४ धावा केल्या; पण त्यानंतर दोन धावांत ६ गडी बाद झाल्याने केकेआरचा विजय राजस्थानने हिसकावून नेला. केकेआरकडून फलंदाजीत जॅक्स कालिस आणि रॉबिन उथप्पा चमक दाखवीत असले, तरी मनीष पांडे आणि युसूफ पठाण हे अपयशीच ठरले. गोलंदाजीत नरेनने ७ सामन्यांत ११ बळी मिळविले. याशिवाय, शाकीबने उत्तम मारा केला; पण अन्य गोलंदाज अपयशीच ठरले आहेत. दिल्ली संघदेखील फलंदाजी व गोलंदाजीत अपयशी ठरला. पीटरसनच्या अपयशानंतरही चेन्नईविरुद्ध आव्हानात्मक धाव उभारल्यानंतर मोहंमद शमीच्या नेतृत्वात गोलंदाज बचाव करण्यात अपयशी ठरले होते. दिल्लीला केकेआरशिवाय हैदराबाद आणि पंजाबविरुद्ध आपल्याच मैदानावर सामने खेळायचे आहेत; पण घरची खेळपट्टी त्यांच्या खेळाडूंवर रुसलेली दिसते. गॅरी कर्स्टनसारख्या कोचला घसरलेली गाडी रुळावर कशी आणायची, याची चिंता लागली आहे. शमी, पार्नेल, शाहबाज नदीम हे सर्व गोलंदाज बळी घेण्यात अपयशी ठरत असल्याने विजय हातचा निसटत आहे. अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात दिल्लीने केकेआरचा पराभव केला होता. लाभ त्यांना या सामन्यातही घ्यावा लागेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Daredevils' fight against KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.