‘डार्क फ्रेम’ डर्बन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात
By admin | Published: June 8, 2016 07:24 PM2016-06-08T19:24:19+5:302016-06-08T19:39:39+5:30
गोमंतकातील कलाकार भूपेश बांदेकर यांनी साकारलेल्या ‘डार्क फ्रेम’ या चित्रपटाची निवड पुढील महिन्यात साउथ आफ्रिका येथे होणाऱ्या ३७व्या डर्बन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ८ - गोमंतकातील कलाकार भूपेश बांदेकर यांनी साकारलेल्या ‘डार्क फ्रेम’ या चित्रपटाची निवड पुढील महिन्यात साउथ आफ्रिका येथे होणाऱ्या ३७व्या डर्बन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. या चित्रपट महोत्सवात देशातून केवळ तीन चित्रपटांची निवड झाली आहे.
साळगाव येथील भूपेश शंभू बांदेकर हे व्यावसायाने वकील असून कलाकार होण्याची आवड आहे. सध्या ते मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय करत असून आवड म्हणून चित्रपट, जाहिरातींमध्ये भूमिका करतात.
डिजिटल जगात आपण अनाकलनीयपणे गुंतत चाललो आहोत. या जगात वावरताना आपल्यातील भावना आणि प्रेम यांची व्याख्याही बदलली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या आणि डिजिटल जगाचे बळी ठरलेल्या नवीन दाम्पत्याच्या आयुष्यावर आधारित ‘डार्क फ्रेम’ ही कथा आहे. डिजिटल जगात वावरताना, त्यांच्या आहारी जाताना किंवा बळी ठरल्यानंतर नातेसंबंधांची वीण कशापद्धतीने उलगडावी आणि कायम ठेवावी या विषयावर ही कथा बांधली आहे.
गोवा फिल्म बाजारमध्ये समावेश
‘डार्क फ्रेम’ ही दिग्दर्शक नवीन चंद्र गणेश यांचा चित्रपट असून गतवर्षी कोच्ची, केरळ येथील चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियर दाखविण्यात आला आहे. एनएफडीसी फिल्म बाजार २0१५ गोवा याचा भागही बनली होती. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत भूपेश यांच्या समवेत कोलकाता येथील कलाकार अर्पिता बॅनर्जी यांनी भूमिका साकारल्या आहेत.