अंधार पडताच पाकचा भारतीय चौक्यांवर हल्ला

By admin | Published: October 28, 2016 05:15 AM2016-10-28T05:15:45+5:302016-10-28T05:15:45+5:30

सर्जिकल स्ट्राइक्सनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने सीमेपलिकडून सातत्याने गोळीबार सुरू ठेवला असून, गुरुवारीही अंधार पडताच भ्याड पाक सैनिकांनी भारतीय चौक्यांवर जोरदार

In the dark, Indian attack on Indian posts | अंधार पडताच पाकचा भारतीय चौक्यांवर हल्ला

अंधार पडताच पाकचा भारतीय चौक्यांवर हल्ला

Next

श्रीनगर : सर्जिकल स्ट्राइक्सनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने सीमेपलिकडून सातत्याने गोळीबार सुरू ठेवला असून, गुरुवारीही अंधार पडताच भ्याड पाक सैनिकांनी भारतीय चौक्यांवर जोरदार बॉम्बवर्षाव व गोळीबार केला. हल्ल्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात अनेक पाक रेंजर्स जखमी झाले असून पाकच्या अनेक गावांमध्ये आग लागल्याचे वृत्त आहे. गोळीबारात पाच भारतीय जवान जखमी झाले आहेत. त्यांना हवाईमार्गे इस्पितळात हलविण्यात आले.
तंगधार, अखनूर आणि मेंढर या ठिकाणांवर पाक रेंजर्सनी जोरदार गोळीबार केला. गोळीबारामुळे सीमेवरील गावक-यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांना फोन करून पाकला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनाही नियंत्रण रेषेवरील हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
पाकिस्तानी सैनिक नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ दबा धरून बसले. त्यांच्याकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होता. तसेच ग्रेनेड अटॅक आणि मोर्टारनेही हल्ला केला जात
होता. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाल्याचे वा ठार झाल्याची शंका आहे. त्यांच्यासाठी सीमेपलिकडे मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका असल्याचे दिसून आले आहे. भारताचा सर्जिकल स्ट्राईक्सनंतर पाकने ५५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

पाक कर्मचाऱ्याची दिल्लीत बसून हेरगिरी
संरक्षणविषयक संवेदनशील कागदपत्रे बाळगल्याच्या कारणावरून पोलिसांनी येथे पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. त्याला अस्वीकार्य व्यक्ती घोषित करण्यात आले. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करणाऱ्या हेरांच्या समूहाचा हा म्होरक्या असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
भारत-पाक सीमेवर बीएसएफच्या तैनातीबाबतची माहितीही या दस्तऐवजात होती. बराच काळ चौकशी केल्यानंतर मेहमूद अख्तरला सोडण्यात आले. कारण, त्याला परराष्ट्र संबंधविषयक सूट प्राप्त आहे. मात्र त्याला ४८ तासांतच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकने आरोप फेटाळले
पाकच्या विदेश कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन त्याच्यासोबत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी बासित यांनी विदेश सचिवांसमोर विरोध व्यक्त केला. भारताने केलेले आरोप पाकने फेटाळले आहेत.

भारतीय अधिकाऱ्याला
पाकिस्तान सोडण्याचे आदेश
भारताने पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याला अस्वीकार्य केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने सुरजित सिंग या भारतीय अधिकाऱ्याला ४८ तासांत देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: In the dark, Indian attack on Indian posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.