आणीबाणी भारताच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस - नरेंद्र मोदी
By admin | Published: June 25, 2015 09:26 AM2015-06-25T09:26:02+5:302015-06-25T12:49:23+5:30
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला आज चाळीस वर्ष पूर्ण होत असतानाच 'हा भारतीय इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि. २५ - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला आज चाळीस वर्ष पूर्ण होत असतानाच ' हा भारतीय इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याची टिपण्णी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून केली आहे. २५ जून १९७५ साली तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. 'तो काळ म्हणजे देशासाठी अंधारयुग असल्यासारखा होता, जेव्हा अनेक राजकीय नेत्यांना बंदिस्त करण्यात आले होते' असे सांगत मोदींनी त्यावेळच्या आठवणी जाग्या केल्या.
' आणीबाणीविरुद्ध संपूर्ण क्रांतीचे आवाहन करणा-या लोकनेते जयप्रकाश नारायण यांना प्रतिसाद देत देशभरातील युवक, महिला व पुरूषांनी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी स्वत:ला निस्वार्थीपणे झोकून दिले. लोकशाहीच्या रक्षणासाठी झटणा-या त्या नागरिकांचा आम्हाला अतिशय अभिमान आहे', असेही मोदींनी नमूद केले आहे. आणीबाणीविरोधातील आंदोलनातून आम्हा तरूणांना अनेक गोष्टी शिकायला मिळालं, असंही मोदींनी नमूद केलं आहे. तो काळ म्हणजे देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी, अनेक नेत्यांसोबत स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्याच्या ध्येयासाठी लढण्याची उत्तम संधी होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच एक सशक्त, उदारमतवादी स्वातंत्र्याचा पुरसक्रा म्हणजे प्रगतीची, विकासाची गुरूकिल्ली आहे असे सांगत तिच्या मजबुतीसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केले.