अचानक लूप आणि अप लाईनचा सिग्नल रेड झाला; डेटा लॉगरवरून कोरोमंडल अपघाताचे डिटेल्स आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 09:40 AM2023-06-08T09:40:33+5:302023-06-08T09:41:31+5:30
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला.
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तिहेरी रेल्वेअपघाताबाबत मोठी माहिती समोर आली आहे. डेटा लॉगरकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोमंडल ट्रेनला होम सिग्नल आणि आऊटर सिग्नल दोन्हीवर ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. पण अचानक सिग्नल आधी अप लाईनवर आणि नंतर लूप लाईनवर रेड झाला. कोरोमंडल एक्सप्रेस लूप लाइनवरच मालगाडीला धडकली.
प्रेयसीच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला घातले; मीरा रोडमध्ये थरकाप उडवणारी घटना
ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. येथे कोरोमंडल एक्सप्रेस लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले. यावेळी तेथून जाणाऱ्या यशवंतपूर हावडा गाडीला धडकली. या भीषण अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११०० हून अधिक जखमी झाले आहेत.
आज बालासोर ट्रेन दुर्घटनेतील डेटा लॉगर ऍक्सेस केला आहे. यालाच ट्रेनचा ब्लॅक बॉक्स असेही म्हणतात.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा एखादी ट्रेन रुळावर उभी असते तेव्हा डेटा लॉगरवरील लाइन लाल होते. जेव्हा ट्रॅक रिकामा असतो तेव्हा तो राखाडी असतो. जेव्हा सिग्नल स्पष्ट पासून पिवळा होतो, तेव्हा UP आणि DOWN रेषा येलो होतात. अगोदर येशवंतपूर-हावडा ट्रेन डाऊन मार्गावर काढण्यासाठी पिवळा आणि हिरवा रंग सिग्नल मंजूर करण्यात आला. यानंतर कोरोमंडल गाडीसाठी अप मार्गाचे सिग्नल मोकळे झाले. अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार, हावडा ट्रेन जात असताना कोरोमंडल ट्रेन बहनगा बाजार स्टेशनजवळ पोहोचू लागली. त्यावेळी कोरोमंडल ट्रेनला होम सिग्नल आणि आऊटर सिग्नल दोन्हीवर ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. अचानक अप लाईनचा ट्रॅक लाल होतो आणि नंतर लूप लाईनचा ट्रॅक देखील लाल होतो. यावर मालगाडी उभी होती. लॉगची वेळ 18.55 होती. ही संपूर्ण घटना डेटा लॉगरवर पाहिली जाऊ शकते.