पं.स.च्या स्थलांतरास डाएटचा खोडा सभागृह व खोल्या अडकल्या : खोल्या रिकाम्या करण्याचे पत्र
By Admin | Published: March 15, 2016 12:34 AM2016-03-15T00:34:26+5:302016-03-15T00:34:26+5:30
जळगाव- पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये पुरेशी जागा नाही. यामुळे पं.स.चे कार्यालय विद्यानिकेतन विद्यालयानजीकच्या रिमाक्या इमारतीत स्थलांतर करण्यास जि.प.प्रशासनाने मंजुरी दिली आहे. पण या विद्यालयानजीकच्या इमारतीमधील दोन खोल्या व एक सभागृह अजूनही डाएट व निरंतर शिक्षण विभागाने अडकवून ठेेवले आहे.
ज गाव- पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये पुरेशी जागा नाही. यामुळे पं.स.चे कार्यालय विद्यानिकेतन विद्यालयानजीकच्या रिमाक्या इमारतीत स्थलांतर करण्यास जि.प.प्रशासनाने मंजुरी दिली आहे. पण या विद्यालयानजीकच्या इमारतीमधील दोन खोल्या व एक सभागृह अजूनही डाएट व निरंतर शिक्षण विभागाने अडकवून ठेेवले आहे. यामुळे स्थलांतर करण्यास अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता जि.प.प्रशासनाने खोल्या व सभागृहाचा ताबा सोडण्यासंबंधी डाएट व निरंतर शिक्षण विभागाला पत्र दिले आहे. या वृत्तास सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठांनी दुजोरा दिला. जानेवारीचा मुहूर्त टळलापं.स.चे कार्यालय विद्यानिकेतन विद्यालयानजीकच्या डाएटकडे असलेल्या जुन्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्यासाठी १ जानेवारी ही तारीख निश्चित केली होती. परंतु सभागृह डाएटच्या ताब्यात आहे. एका खोलीत डाएटचे सामान अजून आणखी एक खोली निरंतर शिक्षण विभागाच्या ताब्यात आहे. ही बाब लक्षात घेता स्थलांतर झाले नाही. दुरुस्तीचा प्रस्तावपं.स.साठी कार्यालय, सभागृह, पदाधिकार्यांची दालने व इतर सुविधा गरजेच्या आहेत. ही बाब लक्षात घेता सभागृहाची दुरुस्ती, दालने निर्मितीचा प्रस्तावही ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.