मोबाइलवरून मिळावी कोर्टाची तारीख - मोदी
By admin | Published: April 2, 2017 01:06 PM2017-04-02T13:06:36+5:302017-04-02T13:58:04+5:30
न्यायालयीन खटल्यांची तारीख मोबाइलवर एसएमएसच्या माध्यमातून मिळावी, अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी
Next
ऑनलाइन लोकमत
अलाहाबाद, दि. 2 - व्यवहारांमध्ये तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापराचा आग्रह धरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायव्यवस्थेमध्येही तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रह धरला आहे. न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा अधिक वापर व्हायला हवा, न्यायालयीन खटल्यांची तारीख मोबाइलवर एसएमएसच्या माध्यमातून मिळायला हवी, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आज झालेल्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश खेहर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी बोलताताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यायव्यवस्थेतील तंत्रज्ञानाच्या वापराबाबत भाष्य केले. ते म्हणाले, "भारताच्या न्याय जगतातील अलाहाबाद उच्च न्यायालय हे एक तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राच्या महत्त्वाच्या टप्प्यावर तुमच्यामध्ये येऊन काही ऐकण्याची समजण्याची संधी मिळाली, हा मी माझा सन्मान समजतो. न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा. तंत्रज्ञानामुळे वकिलांचे काम सोपे झाले आहे. आता न्यायलयाची तारीख मोबाइल, एसएमएसवरून मिळायला हवी,"
सरन्यायाधीश खेहर यांनी यावेळी बोलताना न्यायालयातील न्यायाधीशांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी न्यायाधीशांची संख्या आणि न्यायलयात प्रलंबित असलेल्या खटल्यांबाबत चिंता व्यक्त केली. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, कायदा हा शासकांचाही शासक असतो असे सांगितले.
PM Modi speaking at 150 year celebrations of Allahabad High Court https://t.co/iRCBkTWO2z
— ANI (@ANI_news) April 2, 2017