मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार किती? सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 08:06 AM2022-01-21T08:06:51+5:302022-01-21T08:07:13+5:30

हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांना संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला.

daughter claim father's property? An important decision of the Supreme Court | मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार किती? सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार किती? सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

googlenewsNext

सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. जर एखाद्या हिंदू पुरुषाचा विना मृत्यूपत्र मृत्यू झाला तर त्याच्या मुली या त्याने कमविलेली संपत्ती आणि अन्य संपत्ती मिळवू शकतात. महत्वाचे म्हणजे मुलांपेक्षा या संपत्तीमध्ये मुलींना प्राधान्य असेल. मद्रास हायकोर्टाच्या एका निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. 

हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांना संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यूपत्र न वनविताच झाला असेल तसेच ती मालमत्ता त्याने स्वत: कमवलेली असेल किंवा वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेचे कायदेशीर वारसांमध्ये विभाजन होते.

जर हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला आणि त्याची मुलगी ही वारस असेल, तसेच त्या पुरुषाचे भाऊ किंवा भावांची मुले आदींमध्ये जर वडिलोपार्जित संपत्ती वाटली जात असेल तर त्या पुरुषाच्या मुलीला समान हक्क मिळणार आहे. या प्रकरणात मुलीने वडिलांनी स्वत: कमविलेल्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळविण्यासाठी कोर्टाचा दरवाजा खटखटावला होता. अन्यकायदेशीर वारसाच्या अनुपस्थितीत खंडपीठाने मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत हिस्सा कसा देता येईल यावर सुनावणी घेतली. या प्रकरणी हा निर्णय दिला आहे. 

Web Title: daughter claim father's property? An important decision of the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.