नातीवर बलात्कार करून लंडनला पळणाऱ्या आजोबाला अटक
By admin | Published: July 7, 2017 12:31 PM2017-07-07T12:31:39+5:302017-07-07T12:31:39+5:30
आरोपी आणि त्याच्या पत्नीला लंडनला पळून जात असताना मुंबई एअरपोर्टवर अटक करण्यात आली.
Next
ऑनलाइन लोकमत
गुरूग्राम, दि. 7- पाच वर्षाच्या नातीवर बलात्कार करणाऱ्या 64 वर्षीय नराधमाला गुरगाव पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी संध्याकाळी आरोपी आणि त्याच्या पत्नीला लंडनला पळून जात असताना मुंबई एअरपोर्टवर अटक करण्यात आली.आरोपीच्या पत्नीला पीडितेला मारहाण केल्याचा तसंच घडलेला प्रकार पीडितेच्या आईपासून लपविल्याचा आरोप ठेवून अटक करण्यात आली आहे. हिंदूस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.
आरोपी मुंबई एअरपोर्टवरून लंडनला पळून जाणार असल्याची माहिती गुरगाव पोलिसांना मिळताच त्यांच्या तीन जणांच्या पथकाने त्या दोघांना अटक केली. या दोन्ही आरोपींना गुरूवारी गुरगावमध्ये नेऊन त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
"मुंबई एअरपोर्टवर आरोपी विमानाची वाट पाहत असताना आमच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. बलात्कार प्रकरणी आपल्याला अटक होणार याची त्यांना माहिती असल्याने त्या दोघांना शहर सोडून जायचं होतं. आधी महिला पोलीस स्टेशनची टीम त्यांच्या जमशेदपूरमधील घरी गेली असता घराला कुलूप असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यावेळी पोलीस पथकाने आम्हाला तात्काळ त्याची माहिती देऊन सावध केलं. महिला पोलीस टीमच्या माहितीनंतर आम्ही या जोडप्यासाठीची शोध मोहीम सुरू केली असल्याची माहिती ही संपूर्ण कारवाई करणारे पोलिस अधिकारी कैलाश यांनी दिली आहे.
पतीसह संपूर्ण घरच्यांचा तीव्र विरोध असूनही मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सासू-सासऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याने पीडितीच्या आईला याचं श्रेय द्यायला हवं. त्यांच्या तक्रारीशिवाय ही घटना उघड झालीच नसती, असंही त्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
आणखी वाचा
मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला चोप
तरुणीचे अपहरण आणि बलात्कार ?
अपहृत मुलगी सापडली आईकडेच
मुळचं झारखंडमधील जमशेदपूरचं असणार पीडित मुलीचं कुटुंबिय गुरगाव सेक्टर 59 मध्ये राहतात. पीडित मुलीचे आजोबा तसंच याप्रकरणातील आरोपी एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते.
पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडी जमशेदपूरमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत आजी-आजोबांच्या घरी गेली असताना ही घटना घडली होती. तसंच आरोपीच्या पत्नीने मुलीला मारहाण केली तसंच घरी सांगितलं तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली होती.